सरकारने कर्जमुक्तीची घोषणा तत्काळ करावी : राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मदत म्हणून माजी आमदार मोहनराव सोळंके यांनी एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला.
Raju-Shetty-in-Majalgaon
Raju-Shetty-in-Majalgaon

माजलगाव (जि. बीड) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे शेतकरी विरोधी धोरणाचा पुरस्कार करणारे आहे. केंद्र सरकारने अनेक शेतकरी विरोधी करार केले. यामुळे शेतकऱ्यांनी एकजुटीने या सरकारच्या धोरणांचा पाडाव करावा असे आवाहन करत राज्यातील महाविकास आघाडी सरकाने तत्काळ कर्जमुक्तीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी खासदार राजु शेट्टी यांनी केली.


येथे सोमवारी आयोजित ऍड . रामराव नाटकर बळीराजा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. वस्त्रद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश काळे, माजी आमदार मोहनराव सोळंके, राजेंद्र जगताप, अमित नाटकर, अॅड. गोले, संदीप जगताप, मोहन गुंड, पूजा मोरे, अमोल हिप्परगे आदी उपस्थित होते. 


शेतकरी नेते इक्बाल पेंटर, डॉ. उद्धव घोडके यांना अॅड. रामराव नाटकर बळीराजा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री. शेट्टी म्हणाले की, अॅड. रामराव नाटकर यांनी मागील चार दशकात जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी चळवळ जिवंत ठेवून आयुष्यभर केलेला संघर्ष नवीन तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे.

येत्या आठ जानेवारी २०२० ला प्रादेशिक व्यापक भागीदारी करार रद्द करून शेतमालाला दीडपट हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती, शेतकरी विरोधी धोरणाविरोधात ग्रामीण भारत बंदची देशव्यापी हाक दिली असून या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही श्री. शेट्टी यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, धम्मानंद साळवे, अमित नाटकर, रामप्रसाद काळे, रामचंद्र डोईजड उपस्थित होते.

सोळंकेंकडून एक लाखाची मदत

या कार्यक्रमात माजी आमदार मोहनराव सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी संघटनेला मदत म्हणून एक लाख रुपयाचा धनादेश खासदार राजु शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com