चंद्रकांतदादांनी बिनकामाची पाटीलकी सोडावी : राजू शेट्टी यांचा टोला

.
patil_shetty.
patil_shetty.

कोल्हापूर: " कृषी पंपाची वीज दरवाढ कमी करावी म्हणून इरिगेशन फेडरेशन व सर्व शेतकरी संघटनांनी महामार्ग रोको आंदोलन केले होते, त्यावेळी वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून हा प्रश्‍न 15 दिवसांत सोडवण्याचे आश्‍वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते, तथापि त्यांनी हा शब्द पाळला नाही. प्रश्‍न सोडवायचा नसेल तर मध्यस्थी कशाला करायची, त्यांनी ही बिनकामाची पाटीलकी सोडून द्यावी," असा टोला माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज लगावला. 

कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले,"कृषी पंपाची वीज दरवाढ रद्द करावी यासाठी महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पाटील यांनी वीजमंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करून 15 दिवसांत हा प्रश्‍न सोडवण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते, पण त्यांनी ते पाळले नाही. फक्त उच्चदाब ग्राहकांना प्रती युनिट 1.16 रूपयांनी बिले आली, इतरांनी वाढीव दराचीच बीले पाठवली गेली.''
 
ते म्हणाले,"हे आंदोलन होऊ नये म्हणून महसूल मंत्री पाटील प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी मध्यस्थीही केली, पण त्यांना ती पूर्ण करता आली नाही. जर त्यांनी मध्यस्थी करून जो शब्द दिला होता, तो पाळता आला नाही. मग त्यांनी ही फुकटची पाटीलकी का केली ? असा आमचा प्रश्‍न आहे. जमत नसेल तर त्यांनी मध्यस्थी करू नये. मध्यस्थी केल्यानंतर त्यांची जबाबदारी होती, त्यांनी वीज बिलात दुरूस्ती करून द्यावी. सर्वच कृषी पंपांना प्रती युनिट 1 रूपये 16 पैसे दराने बीले द्यावीत. याच मागणीसाठी 1 जुलै रोजी आम्ही दसरा चौकातून महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. त्यावेळी आमची ताकद त्यांना दाखवू.' 
यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील, प्रताप होगाडे आदि उपस्थित होते. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com