`चंद्रकांत पाटलांनी विधानसभा लढवावी; मी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकणार`

`चंद्रकांत पाटलांनी विधानसभा लढवावी; मी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकणार`

औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिल असून ते  विधानसभा निवडणूक लढवणार असतील तर शड्डू ठोकायला मी तयार असल्याचे सांगत पाटील यांना मैदानात येण्याचा सल्ला दिला आहे.

पाटील हे कोल्हापूरमधून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. मात्र तसे नसल्याचे त्यांनी नंतर स्पष्ट केले. पुण्यातील कसबा मतदारसंघातूनही त्यांनी चाचपणी केली होती. प्रत्यक्षात आपण पक्ष सांगेल त्या ठिकाणी जाणारे पाकिट असून, आपल्याला वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

राजू शेट्टी आणि चंद्रकांत पाटील यांची सुरवातीच्या काळात चांगले संबंध होते. मात्र सदाभाऊ खोत हे राज्यमंत्री झाल्यानंतर पाटील आणि शेट्टी यांच्यात ठिणगी पडू लागली. कोल्हापूरच्या राजकारणातून शेट्टींना हद्दपार करण्यासाठी नंतर पाटील यांनी खोत यांना ताकद दिली. त्याचा राग खोत यांना आहे. पाटील यांनी खरोखरीच निवडणूक लढविली तर तो प्रेक्षणीय सामना ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com