raju shetty | Sarkarnama

राजू शेट्टी "मातोश्री"वर ; उद्धव ठाकरेंची चर्चा

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते. स्वाभिमानी नेता व शिवसेनाप्रमुख यांच्यामध्ये "मातोश्री"वर बंद दरवाजा आड खलबते झाली असल्याचे समजते. 

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते. स्वाभिमानी नेता व शिवसेनाप्रमुख यांच्यामध्ये "मातोश्री"वर बंद दरवाजा आड खलबते झाली असल्याचे समजते. 

या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत विचारले असता राजू शेट्टी सरकारनामाशी बोलताना म्हणाले, " शहापूरला आम्ही समृद्धी महामार्गसंबंधी आंदोलन केले आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबतही आम्ही आग्रही आहोत. हे उद्धवसाहेबांना सांगितले. 
त्यावर कर्जमाफीची मागणी आपण अशीच लावून धरण्याची ग्वाहीही ठाकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर इतर प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दीड तास चर्चा केली असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या प्रकरणात शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका या बैठकीत त्यांनी स्पष्ट केली असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. 

शेट्टी म्हणाले, " बऱ्याच दिवसांनी मी मातोश्रीवर गेलो होतो. त्यामुळे दिलखुलास गप्पा झाल्या." राजकीय परिस्थीवर काही चर्चा केल्याचे शेट्टी यांनी नकार दिला. या भेटीने आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनाही रस्त्यावर उतरण्याचे संकेत मिळत आहेत.राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाले असून विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा कोल्हापूर येथून सुरू झाला आहे. विरोधकांच्या रडारवर सध्या सरकारसह सत्तेत सहभागी झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. यामुळेच खासदार राजू शेट्टी यांच्या या भेटीला महत्त्व आले आहे. राज्याच्या राजकारणात दुय्यम वागणूक मिळत असल्याने दोन्ही पक्ष संघटना भाजपवर नाराज आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेत निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला नाशिक जिल्हा परिषदेसह विविध ठिकाणी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आगामी काळात वाटचालीसंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्‍यता अधिक आहे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख