Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana

लोक आपल्याला जोड्याने मारतील या भितीपोटीच सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले - राजू शेट्टी

''परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे सत्तास्थापनेसाठीच्या जागेच्या वाटाघाटी सुरु आहेत. विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतरच सत्ताधाऱ्यांना जाग आली. तेव्हाच सत्तेतल्यादोन्ही पक्षांनी नुकसानीची पाहणी सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर नाही गेल्यास लोक जोड्याने मारतील याच भितीपोटी सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत," असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्‌टी यांनी केला.

सिल्लोड : ''परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे सत्तास्थापनेसाठीच्या जागेच्या वाटाघाटी सुरु आहेत. विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतरच सत्ताधाऱ्यांना जाग आली. तेव्हाच सत्तेतल्या दोन्ही पक्षांनी नुकसानीची पाहणी सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर नाही गेल्यास लोक जोड्याने मारतील याच भितीपोटी सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत," असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्‌टी यांनी केला.

राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता.5) औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तेव्हा माध्यमांशी बोलताना हे सांगितले. राजू शेट्टी यांनी सिल्लोड तालुक्‍यातील भवन,चिंचखेडा, मंगरुळ हट्टी, बहुली, मांडणा, उंडणगाव, गोळेगाव आणि लिहाखेडी या गावातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेट्टी म्हणाले, ''विधानसभेच्या निकालानंतर भाजप-शिवसेना सत्ता स्थापनेत व्यग्र आहेत. आम्ही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तेव्हा सत्ताधाऱ्यांना जाग आली.'' या भेटीत शेतकऱ्यांनी नुकसानीची व्यथा, राजू शेट्टी यांच्या समोर मांडल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com