मतदारसंघात जा, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्याचा उद्धवजींचा आदेश - उदयसिंग राजपूत

मतदारसंघात जा, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्याचा उद्धवजींचा आदेश - उदयसिंग राजपूत

औरंगाबाद : राज्यात सत्ता स्थापनेसाठीच्या हालाचाली सुरू होत्या, शिवसेनेचे सगळे आमदार हॉटेलातच थांबून होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येऊन आम्हाला सांगत होते, आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, काहीही काळजी करू नका, आमदारांनी देखील साहेबांवरच विश्‍वास दाखवत " तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, तुम्ही सांगाल तितके दिवस आमची इथे थांबण्याची तयारी आहे' असे सांगितले होते. 

आता राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी सत्ता स्थापनेची प्रक्रिया, बोलणी संबंधित नेते करतच आहेत. उध्दव साहेबांनी मात्र आम्हाला आता, तुम्ही मतदारसंघात जा, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, अडचणी सोडवा, गरज पडेल तेव्हा तुम्हाला परत बोलवू असे सांगत मतदारसंघात परतण्याचे आदेश दिल्याचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

राज्यातील सत्ता पेच सोडवण्याचे प्रयत्न शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाकडून सुरू आहे. या दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईच्या हॉटेलात थांबवण्यात आले होते. या दरम्यान घडलेल्या घडामोडी, आमदारांची मानसिकता, अवस्था या संदर्भात कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्हाला हॉटेलच्या बाहेर पडण्यास आणि प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. शंकाकुशंका, गैरसमज नको म्हणून आम्ही देखील हॉटेलात थांबणेच पसंत केले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या दरम्यान दोनवेळा आमच्याशी संवाद साधला, आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, सगळ काही सुरळीत होईल असा विश्‍वास ते देत होते. आम्ही हॉटेलमध्ये असलो तरी मतदारसंघातील अतिवृष्टी, त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याकडे आमचे लक्ष लागले होते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना योग्य त्या सूचना देणे, पंचनाम्यांची माहिती घेणे, शेतकऱ्यांशी संपर्क साधणे ही कामे देखील बहुतांश आमदार इथूनच करत होते. 

सत्ता स्थापनेची मुदत टळल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर काल पक्षप्रमुखांनी सर्व आमदारांना आपापल्या मतदासंघात परतण्यास सांगतिले. ओल्या दृष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, अशावेळी तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून घ्या, त्यांना शक्‍य ती मदत करा, त्यांच्या अडचणी प्रश्‍न सोडवा ' असे उध्दव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले असल्याचेही उदयसिंग राजपूत यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com