स्वतंत्र विदर्भासाठी माजी उपमुख्यमंत्री तिरपुडेंचे पुत्र लढवणार 62 जागा 

विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक व राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांचा वैचारिक वसापुढे चालवत स्थापन झालेल्या विदर्भ माझा पार्टीने आता स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा मतपेटीतून बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हा पक्ष राजकुमार तिरपुडे यांच्या नेतृत्वात विदर्भातील सर्व 62 विधानसभा मतदरासंघात उमेदवार उभे करणार असल्याची माहिती पक्षाचे सरटिचणीस मंगेश तेलंग यांनी रविवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिली.
स्वतंत्र विदर्भासाठी माजी उपमुख्यमंत्री तिरपुडेंचे पुत्र लढवणार 62 जागा 

अकोला : विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक व राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांचा वैचारिक वसापुढे चालवत स्थापन झालेल्या विदर्भ माझा पार्टीने आता स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा मतपेटीतून बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हा पक्ष राजकुमार तिरपुडे यांच्या नेतृत्वात विदर्भातील सर्व 62 विधानसभा मतदरासंघात उमेदवार उभे करणार असल्याची माहिती पक्षाचे सरटिचणीस मंगेश तेलंग यांनी रविवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिली. 

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या लढ्यासाठी तरूण रस्त्यावर उतरून लढा देण्यास घाबरतो. त्यांना येथे रोजगार नसल्यानॆ ते नोकरीसाठी कोणतेहे गुन्हे स्वतःच्या नावापुढे लावून घेण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे आता लढ्याला राजकारणी घाबरत नाही. त्यांना भिती आहे ती फक्त मतांची. त्यामुळे विदर्भातील मतदारांच्या बळावरच स्वतंत्र विदर्भाची चळवळ बळकट करणे शक्य आहे. हा लढा राजकीय चळवळ झाल्यानंतर जेव्हा विदर्भाला विरोध करणाऱ्यांची मतं कमी होतील तेव्हाच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या स्थापनेचा विचार होईल. त्यामुळेच नाशिकराव तिरपुडे यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा मुलगा राजकुमार तिरपुडे यांनी विदर्भा माझा पार्टीची स्थानप केली. या पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भाचा लढा राजकीय चळवळीत रुपांतरीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्वतंत्र विदर्भ व्हावा असे वाटत असलेल्या कोणत्याही पक्षातील दुर्लक्षित कार्यकर्त्यांना विदर्भ माझा पार्टी सामावून घेईल. त्यांच्यात क्षमता असेल तर त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याची संधीही दिली जाईल, असे तेलंग यांनी सांगितले. 

तेलंग यांनी मतदारांनाही स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने लढणाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. पूर्व विदर्भात 12 विधानसभा मतदारसंघात विदर्भ माझाचे उमेदवार निश्चित झाले असल्याचे ते म्हणाले. 

अकोला, वाशीम, नागपूर जिल्हा परिषदेतही उमेदवार
विदर्भातील अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची निवडणूक येत्या काळात होणार आहे. त्यासाठीही विदर्भ माझा पार्टी सज्ज आहे. तिन्ही जिल्ह्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पक्ष उमेदवार उभे करणार असल्याची माहिती तेलंग यांनी दिली. 

बाळासाहेबांनी दिले होते न्याय देण्याचे आश्वासन
शिवसेना संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करीत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने बोलणाऱ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा करते. मात्र उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच वडिलांनी रामटेक येथील जाहीर सभेत विदर्भाला दोन वर्षात न्याय मिळवून दिला नाही तर स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी मी स्वतः तुमच्यासोबत उभा राहील, असे आश्वासन दिले होते, त्याचा विसर पडल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांनीही आता विदर्भाला न्याय मिळवून देण्याची घोषणा करावी, अन्यथा स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा विरोध करणे बंद करावे, असे आवाहन तेलंग यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com