... तर साहेब म्हणाले तुमचे अगोदरच फायनल झाले !

दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांनी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांना कायम राजकीय बळ दिले. बीड जिल्ह्यातील विलासरावांचे विश्वासू अशी राजकीशोर मोदी यांची ओळख होती.
Vilarao-Modi
Vilarao-Modi

अंबाजोगाई : स्टेट कॉटन फेडरेशनच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या आदल्या दिवशी उमेदवारी अर्ज करु का, असे विचारण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटलो. तुमचे नाव अगोदरच फायनल झाले आहे. हर्षवर्धन पाटील आणि माणिकराव ठाकरेंना भेटा आणि निवडुन  या असे विलासरावांनी सांगीतले. 

न भेटताही देणारे नेते विलासराव देशमुख होते, अशी आठवण अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष  राजकिशोर   मोदी यांनी सांगितली . 

स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक प्रतिनिधी त्या काळी वैधानिक विकास महामंडळावर संचालक म्हणून नेमायचा होता. त्यावेळी आपण कुठलीही मागणी न करता आपली विलासराव देशमुख यांनी मराठवाड्यातून निवड केली होती.  १२ वर्षे आपल्याला या पदावर काम करण्याची संधी मिळाली. आपल्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कधी - कुठे संधी देता येते याची आठवण ठेवणारे नेते ते होते. 

म्हणूनच मला अशा दोन महत्वांच्या ठिकाणी त्यांनी न मागता संधी दिली. विकास कामांच्या बाबतीत कधी त्यांच्याकडे गेलो आणि मोकळ्या हाताने परत आलो असे झाले नाही.

कॉटन फेडरेशन राज्यस्तरावरील मंडळ होते. आपण तालुक्याच्या ठिकाणी काम करणारे असल्याने इथे संधी मिळेल का, याबाबत शंकाच होती. पण, विचारुन पहावे म्हणून त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी यादीत नाव अगोदरच घेऊन ठेवलेले होते असे राजकिशोर मोदी यांनी सांगीतले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com