युतीची सत्ता असून पाच वर्षात त्यांनी काय दिवे लावले : राजेश टोपे

.
Rajesh-Tope
Rajesh-Tope

औरंगाबाद :'या मतदारसंघात सिंचन वाढले. रस्ते चांगले झाले. शिक्षणाची स्थिती चांगली झाली. कौशल्य विकासावर आधारित शिक्षण मिळाल्याने युवकांना रोजगार मिळाला.

शेतीमध्ये, शिक्षणामध्ये सुधारणा केल्यात. त्यामुळे इथलं जीवनमान सुधारलं. मात्र, सगळ्या गोष्टी काही परिपूर्ण होत नसतात, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

विकास झाला नाही म्हणणाऱ्यानी त्यांची सत्ता असताना का विकास केला नाही? आमदार असो वा नसो सत्ता असताना त्यांनी काय दिवे लावले? कोणता दिवा त्यांनी लावला हे त्यांनी सांगावं?  असा खोचक सवाल डॉ. उढाण यांना केला. शिवाय यावेळी माझ्या मतदारसंघात माझाच विक्रम मी मोडणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले. 

मी  राष्ट्रवादीतच : टोपे

सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. काहीजण अजूनही वाटेवर असल्याचं सांगितले जात आहे. त्यात माजी मंत्री राजेश टोपे यांच्या नावाचीही चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र राजेश टोपे यांनी 'मी  राष्ट्रवादीतच आहे ; माझ्या गळ्यात राष्ट्रवादीचाच रुमाल आहे' अशी प्रतिक्रिया दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com