राजेश टोपे शरद पवारसोबतच असतील...

राजेश टोपे शरद पवारसोबतच असतील...

घनसावंगी : राष्ट्रवादी विधीमंडळाच्या पक्षाचे नेते अजित पवार हे भाजपबरोबर जावून उपमुख्यमंत्री बनल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट पडल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचा कोण आमदार कोणाबरोबर याची चर्चा सुरू आहे. त्यातच आमदार राजेश टोपे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण मुंबईतील पत्रकार परिषदेत टोपे शरद पवार यांच्या सोबत उपस्थितीत होते. त्यामुळे टोपे शरद पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आमदार राजेश टोपे व त्यांचे वडील स्वर्गीय अंकुशराव टोपे हे कॉग्रेसपासून शरद पवार यांचे निष्ठावान आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसची स्थापना केल्यानंतरही टोपे कुटुंब त्यांच्या सोबत आहे. सलग अठरा वर्ष आमदार राजेश टोपे यांनी मंत्रिडळात कॅबीनेट मंत्री म्हणून काम पहिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जालना जिल्ह्यात राजेश टोपे हे अंत्यत अटीतटीच्या लढतीत विजयी झाले. मात्र राज्यातील सत्तापेचात ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत आमदार राजेश टोपे यांची उपस्थिती होती त्यामुळे ते शरद पवार यांच्यासोबत राहतील असे चित्र आहे. 

परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या घनसावंगी मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर यांना मताधिक्‍य मिळाले नव्हते. यावरून अजित पवार टोपे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा देखील होती. त्यामुळेच विधानसभा निवडणूकीत राजेश टोपे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसी अजित पवार यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे राजेश टोपे हे शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करीत असल्याचे सूत्राकडून कळते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com