सत्तेत नसतांनाही मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावली - राजेश टोपे

सत्तेत नसतांनाही मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावली - राजेश टोपे

घनसावंगी : कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मंत्री म्हणून केलेले काम, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास या जोरावर पुन्हा मी मतदारांचा कौल मागण्यासाठी निवडणूक लढवत आहे. मंत्री असतांना तर विकासकामे केलीच, पण सत्तेत नसतांनाही गेल्या साडेचार वर्षात बहुतांश कामे करण्यात मला यश मिळाल्याचे समाधान असल्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे घनसांवगी मतदारसंघाचे उमेदवार राजेश टोपे यांनी सांगितले. 

निवडणुकीला सामोरे जात असतांना राजेश टोपे यांनी सत्ताकाळात आणि सत्ता नसतांना मतदारसंघात केलेल्या विकासकामांची जंत्री मतदारांसमोर मांडली आहे. या जोरावरच ते मतदारांचा कौल मागत आहे. पदयात्रा, प्रचारसभा, कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून टोपे आपली भूमिका आणि भविष्यात करावयाच्या कामांची माहिती मतदारांना देत आहेत. टोपे म्हणाले, मागील चार पंचवार्षिक कालावधीत मतदारांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. तो विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी विविध विकासकामांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेला आहे. सिंचन, शिक्षण, आरोग्य, वीजव्यवस्था, प्रशासकीय इमारती यासह सर्वसामान्य घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी मी तत्परतेने काम केले. 

मंत्रिपदावर असतांना लोकहिताची अनेक कामे करता आली तसेच सत्तेत नसतानाही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन बहुतांश विकासकामे मार्गी लावण्याचे काम मी केले आहे. माझी भूमिका अतिशय निःस्वार्थी व प्रामाणिक समाजकारणाची असून सत्ता ही स्वार्थासाठी न वापरता जनतेच्या विकासासाठी तिचा उपयोग लोकप्रतिनिधी म्हणून मी पुरेपूर केला. माझ्या राजकीय जीवनात मी सदैव गोरगरीब, वंचित व समाजातील सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले आणि यापुढेही करत राहणार आहे. भविष्यातील राजकारणाची माझी हीच दिशा आणि ठाम भूमिका असणार आहे. मतदारसंघातील जनतेने मला वेळोवेळी भरभरून प्रेम दिले आहे, ते यावेळीही कायम राहील अशी मला आशा आहे. 

लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याने अनेक प्रतिस्पर्धी माझ्या समोर आहेत. परंतु मी गेल्या वीस वर्षात अंबड, घनसावंगी व जालना या तिन्ही तालुक्‍यातील केलेल्या विकासाची पावती म्हणून मतदार मला पुन्हा सेवेची संधी देतील असा विश्‍वास देखील राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com