लोकांच्या अडचणीला धावून जाणे हा तर त्यांचा स्वभावच आहे - मनिषा टोपे

लोकांच्या अडचणीला धावून जाणे हा तर त्यांचा स्वभावच आहे - मनिषा टोपे

घनसावंगी : गोर-गरिब, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात, अडचणीच्या काळात धावून जाणे, त्यांना मदत करणे हा तर त्यांचा स्वभावच आहे. राजकीय कारकीर्दीत त्यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या बळावरच जनता त्यांना पुन्हा संधी देईल असा विश्‍वास माजी मंत्री तथा राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे घनसांवगीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या पत्नी मनिषा टोपे यांनी व्यक्त केला. 

राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात ठिकठिकाणी कॉनर सभा घेत मतदारांशी मनिषा टोपे यांनी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांच्या गावातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलींना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दरम्यान, राजेश टोपे यांनी वीस वर्षात मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती त्या मतदारांना देत आहेत. मनिषा टोपे म्हणाल्या, राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता असताना व मंत्रिपदाच्या काळात टोपे यांनी जनहिताची अनेक कामे केली आहेत. विविध समाजघटकांच्या हितांची काळजी घेतली, मागील पाच वर्षात सत्ता नव्हती तरी संबंधितांकडे पाठपुरावा करून संघर्ष करून मतदारसंघातील विकासकामांमध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही. वीज, शेतकऱ्याचा पीक विमा, शैक्षणिक असो की मग रोजगाराचा प्रश्‍न, या सर्वांच्या विरोधात विधानसभेत आवाज उठवून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. 

लोकांचे प्रश्‍न मांडून ते धसास लावत केलेल्या विकासकामाची पावती म्हणून त्यांना पुन्हा सधी द्या, मतदारांनी कोणत्याही भूलथापाला बळी न पडता विकास कामाला मते द्यावीत असे आवाहन देखील मनिषा टोपे ठिकठिकाणी करत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com