रामराजे नाही; पण त्यांचे मेहुणे राजेंद्र थिटे भाजपमध्ये!

शरद पवारांचे तरुणपणापासून मित्र असलेले माजी गृह राज्यमंत्री दिवंगत बापूसाहेब थिटे यांचे चिरंजीवराजेंद्र यांचा आज भाजप प्रवेश झाला. राष्ट्रवादी सोडण्याची चर्चा असलेेले विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे चे मेहुणे आहेत.
रामराजे नाही; पण त्यांचे मेहुणे राजेंद्र थिटे भाजपमध्ये!

शिक्रापूर :  माजी खासदार दिवंगत बापूसाहेब थिटे यांचे चिरंजीव व विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे मेहुणे शिरुर बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र थिटे यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत आज त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपात प्रवेश केला. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनीही भाजपचे कमळ या वेळी हाती घेतले. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे  सन १९६२ पासून जिवलग मित्र म्हणून बापूसाहेब थिटे हे राज्याला परिचित होते. शिरुर पंचायत समितीचे सभापती, पुणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष, दोन वेळा आमदार तर एक वेळा खासदार तसेच सन १९९३ च्या काळात गृहराज्यामंत्री म्हणूनही त्यांनी आपला काळ गाजविला. त्यांचेच चिरंजीव असलेले राजेंद्र थिटे हे शिरुर बाजार समितीचे संचालक म्हणूनही राहिले असून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूकीतही स्वत:ला एकदा अजमावले आहे.

भाजपची ध्येयधोरणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात देश-राज्यात केलेल्या भरीव कामगिरीच्या पार्श्वभूमिवर आपण भाजपात प्रवेश केला असून राजकारणात सक्रीय होताना शिक्षण आणि आरोग्य या विषयात आपल्याला विशेष योगदान देण्याचे ठरविले असून आमदार बाबुराव पाचर्णे यांना साथ देण्याच्या उद्देशाने आपण पक्षप्रवेश केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दुसरीकडे कामठे यांनी राष्ट्रवादीच्या चांडाळ चौकटीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
थिटेंचा पक्षप्रवेश शिरुर-हवेली व आंबेगाव-शिरुर अशा दोन्ही मतदारसंघांसाठी मोठ्या राजकीय घडामोडींचा असू शकतो. दरम्यान पक्षप्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, रोहीदास उंद्रे, जिल्हा सरचिटाणीस धर्मेंद्र खांडरे, भाजपाचे सक्रीय सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे सदस्य सतीश साकोरे आदी उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com