बुलडाण्याची सत्तासुत्रे प्रतापराव जाधवांकडून डॉ. शिंगणेंकडे

युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं, असं म्हटलं जातं. परंतु त्या जोडीला आता राजकारणात देखील कधीही काहीही होऊ शकतं हा वाक्प्रचार देखील रूढ झाला आहे. ज्याप्रमाणे राज्यातील सत्ता समीकरणे कमालीची बदलली. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सहकार या क्षेत्रातील सत्तेची समीकरणे पार बदलून गेली आहेत. एकेकाळी बलाढ्य बलवान वाटणाऱ्या खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून ही सूत्रे या निवडणुकीतील नवीन समीकरणामुळे नव्याने पाचव्यांदा मंत्री झालेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे गेली आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेना सत्तेत आहे असे म्हटले तरी बुलडाणा जिल्ह्यात मात्र डाॅ. शिंगणेंचा वरचष्मा आहे, असे म्हणावे लागेल.
rajendra shingane takes control of buldana
rajendra shingane takes control of buldana

बुलडाणा : युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं, असं म्हटलं जातं. परंतु त्या जोडीला आता राजकारणात देखील कधीही काहीही होऊ शकतं हा वाक्प्रचार देखील रूढ झाला आहे. ज्याप्रमाणे राज्यातील सत्ता समीकरणे कमालीची बदलली. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सहकार या क्षेत्रातील सत्तेची समीकरणे पार बदलून गेली आहेत. एकेकाळी बलाढ्य बलवान वाटणाऱ्या खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून ही सूत्रे या निवडणुकीतील नवीन समीकरणामुळे नव्याने पाचव्यांदा मंत्री झालेले डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे गेली आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेना सत्तेत आहे असे म्हटले तरी बुलडाणा जिल्ह्यात मात्र डाॅ. शिंगणेंचा वरचष्मा आहे, असे म्हणावे लागेल.

डॉ. शिंगणे परिवाराला वगळून बुलडाणा जिल्ह्याचे राजकारण शक्य नाही. सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे यांनी या जिल्ह्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. अनेक संस्था उभ्या केल्यात हजारोंच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही जबाबदारी त्यांचे सुपुत्र डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर आली. मध्यंतरीच्या काळात शिंगणे चार वेळा राज्याचे मंत्री होते. मात्र 2014 ची विधानसभेची निवडणूक त्यांनी लढविली नाही, आणि 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यामुळे शिंगणे परिवाराची जिल्ह्यावरील सहकार सामाजिक व राजकीय पकड कमी होते की काय अशी शंका अनेकांना येऊ लागली होती. तशी परिस्थिती असल्याचे भासविण्यात येत होते. 

या काळात शिवसेनेचे संपर्कप्रमुख व बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेला बऱ्यापैकी मजबूत स्थितीत आणून ठेवले होते किंवा मोदी लाटेमुळे ते निवडून आल्याने तसा आभास निर्माण केला जात होता. मात्र 2019 विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये शिंगणे विजयी झाले आणि सत्तेची समीकरणे हळूहळू बदलू लागली. ज्या शिवसेनेच्या विरोधात उमेदवार म्हणून उभे ठाकलेल्या डाॅ शिंगणे यांनी विजयश्री खेचून आणली. त्याच शिवसेना व काँग्रेस सोबत राज्यात सत्ता स्थापन झाली. 

महाविकास आघाडीच्या नावाखाली राज्यातील नेते एक दिलाने काम करू लागल्याचे दिसत असले तरी बुलडाणा जिल्ह्यात मात्र ती परिस्थिती नाही. 2014 मध्ये थांबलेल्या शिंगणेंना पुन्हा राजकारणात डोके वर काढता येऊ नये, असे मनसुबे खासदार प्रतापराव जाधव व त्यांच्या सहका-यांनी रचले होते. त्यादृष्टीने त्यांनी बरेच प्रयत्न देखील केले. 

2019 च्या विधानसभेमध्ये शिंगणे यांनी निवडणुकच लढवू नये अशी हवा तयार केली. त्यानंतर ते निवडूनच येऊ नयेत, असाही प्रयत्न केला. परंतु नियतीला वेगळेच मान्य होते. डॉ शिंगणे निवडून तर आलेच परंतु सत्तेच्या समीकरणात राजकीय पटलावर राज्यस्तरीय नेत्यांमध्ये त्यांचा समावेश असल्याने त्यांना मंत्री पदापासून कोणीही रोखू शकले नाही. त्यांना मंत्रिपद देऊ नये अशी देखील अप्रत्यक्ष भूमिका प्रतापरावांची होती. मात्र ते मंत्री झाले. त्यानंतरही बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिंगणे यांना देऊ नये यासाठी देखील जाधव व त्यांच्या समर्थकांनी बराच आटापिटा केला. यासाठी त्यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याच्या बातम्याही येऊन पोहोचल्या. परंतु वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. 

उलट अन्न व औषध प्रशासना सोबतच बुलडाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा देखील डॉक्टर शिंगणे यांच्या शिरावर दिली. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्यात आधीच दबदबा असलेल्या शिंगणे यांना राजकीय पाठबळ, सामाजिक आधार आणि जनसामान्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. यामुळेच गेल्या महिन्याभरात विविध ठिकाणी त्यांच्या सत्काराला प्रचंड गर्दी उसळू लागली आहे. नुकतेच राज्यातील सरकार स्थिरस्थावर होऊ पहात आहे. अशात जिल्ह्याच्या राजकारणात सहकारामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये व राजकीय क्षेत्रामध्ये काय करायचे याची धुरा डॉ. शिंगणे यांच्याकडे येत असल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com