राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवबंधनात

आज त्यांना अंबाबाई मंदीरात श्री. ठाकरे यांनीच हातात शिवबंधन बांधून धनुष्यबाणाची प्रतिकृती भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
Rajendra Patil-Yadravakar in Shivbandhan
Rajendra Patil-Yadravakar in Shivbandhan

कोल्हापूर: दोन महिन्यांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. श्री. ठाकरे आज अंबाबाई मंदीरात दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी श्री. यड्रावकर यांना शिवबंधन बांधून धनुष्यबाणाची प्रतिमा भेट दिली.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्त्व श्री. यड्रावकर मानतात. जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांची जवळीक आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपात शिरोळची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली. त्यामुळे श्री. यड्रावकर यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवून जिंकलीही. 

निकालानंतर अनेक अपक्ष आमदारांची भाजपाला पाठिंबा देण्यासाठी चढाओढ सुरू असताना श्री. यड्रावकर यांनी मात्र राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवत शिवसेनेला पाठिंबा दिला.
राज्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यात श्री. यड्रावकर यांची अनपेक्षितपणे राज्यमंत्री पदावर वर्णी लागली. त्यांच्याकडे वस्त्रोद्योगसह सार्वजनिक आरोग, अन्न व औषध प्रशासन आदि खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. शुक्रवारी बेळगांवकडे जात असताना श्री. यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. त्यानंतर गनिमी काव्याने ते बेळगांवला पोहचले, त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून श्री. यड्रावकर चांगलेच चर्चेत आहेत. आज त्यांना अंबाबाई मंदीरात श्री. ठाकरे यांनीच हातात शिवबंधन बांधून धनुष्यबाणाची प्रतिकृती भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com