राजेंद्र नागवडे, सुजित झावरे यांचा भाजपमध्ये प्रवेश - rajendra nagawade sujit zaware join bjp | Politics Marathi News - Sarkarnama

राजेंद्र नागवडे, सुजित झावरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनीही भाजपचे कमळ हाती घेत मनसेला रामराम ठोकला.

श्रीगोंदे (नगर) : काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, पारनेरचे राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांनी अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून चर्चेला पूर्णविराम दिला. 

नागवडे व झावरे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. दोघेही विधानसभेसाठी इच्छुक होते, मात्र संबंधित पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे नाराज होत दोघांनीही बंडाचा झेंडा हाती घेत भाजमध्ये प्रवेश केला. नागवडे भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांची ताकद वाढणार आहे. झावरे यांच्या पक्षांतरामुळे शिवसेनेचे पारनेरमधील उमेदवार विजय औटी यांची ताकद वाढणार असल्याने दोन्ही ठिकाणी आघाडीला फटका बसणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख