श्रीगोंद्यात ठरलं! राजेंद्र नागवडे भाजपत जाणार.. पाचपुतेंच्या मांडीला मांडी लावून बसणार!

श्रीगोंद्यात ठरलं! राजेंद्र नागवडे भाजपत जाणार.. पाचपुतेंच्या मांडीला मांडी लावून बसणार!

श्रीगोंदे (नगर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणांच्या बेरजा-वजाबाक्यांचा वेग  वाढतच आहेत. काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे  भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती असून श्रीगोंदयातील महत्वाचे भाजप नेते त्यासाठी  मुंबईत गेले आहेत.

भाजपने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतर विरोधकांची हवा गुल झाली आहे. भाजपा प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळाली नसली तरी या आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता नागवडे कारखान्याच्या एका जबाबदार संचालकांनी 'सरकारनामा' शी बोलून दाखवली. तसे झाल्यास पाचपुते व नागवडे एकाच व्यासपीठावर येतील. अर्थात  हे कार्यकर्त्यांना रुचेल की नाही हे निवडणुकीदरम्यान समजणार आहे.  राजेंद्र नागवडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजप नेते व माजीमंत्री बबनराव पाचपुते, त्यांचे  बंधू सदाशिव पाचपुते, भगवानराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, अनिल पाचपुते  डेरेदाखल झाले असून नागवडे यांच्या प्रवेशाच्या वृत्ताला  दुजोरा मिळाला. दरम्यान नागवडे हे आज मुंबईत प्रवेश करीत करणार की नंतर  एवढीच उत्सुकता राहिल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com