निमंत्रण नसतानाही आमदार जगताप आले, जाताना विधानसभेचा शब्द घेऊन गेले! 

निमंत्रण नसतानाही आमदार जगताप आले, जाताना विधानसभेचा शब्द घेऊन गेले! 

श्रीगोंदे (जि. नगर): राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहूल जगताप यांना वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून बाजूला ठेवण्याची खेळी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष, कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांनी खेळली होती, मात्र नागवडेंच्या वाढदिवसाला जगतापांनी हजेरी लावून कडी केली. मग नागवडे यांनीही "हम सब एक हैं' असे सांगत विधानसभेलाही ही एकी दिसेल, अशी ग्वाही दिली. भले जगताप यांना उमेदवारी मिळाली तरी चालेल असे सांगताना उमेदवारी कुणाला हा निर्णय नेते घेतील, असे सूचक वक्‍तव्यही त्यांनी केले. 

राजेंद्र नागवडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच झाला. कार्यक्रम पत्रिका अथवा जाहीरातींवर कुठेही आमदार जगताप यांचे छायाचित्रच काय साधा नावाचाही उल्लेख नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम कॉंग्रेस पुरताच आहे की काय, अशी शंका येत होती. त्यातच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांचेही छायाचित्र न छापल्याने नागवडे गटाचाच कार्यक्रम आहे, अशी चर्चा होती. मात्र कार्यक्रम सुरु होताच शेलार यांच्या पाठोपाठ आमदार राहूल जगताप कार्यक्रमस्थळी अवतरले. नागवडे यांचा सत्कार करीत त्यांनी लगेच भाषणात नागवडे यांचे कौतुक केले. 

सत्काराला उत्तर देताना राजेंद्र नागवडे म्हणाले, आम्ही कायमच त्यागाची भुमिका ठेवली आहे. गेल्या विधानसभेला नेत्यांनी राहूल जगताप यांना उमेदवारी दिली. आम्ही थांबलो आणि जगताप यांना आमदार करण्यात भूमिका बजावली. पुढच्याही वेळी जगताप यांना आघाडीची उमेदवारी मिळाली तरी आमचे सगळे कार्यकर्ते त्यांचेच काम करतील. मात्र जगताप की नागवडे हा निर्णय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखेपाटील, बाळासाहेब थोरात व शिवाजीराव नागवडे हे घेतील. त्यांनी जो उमेदवार ठरविला तो कॉंग्रेस आघाडीचा असेल असे सांगत एकीवर शिक्कामोर्बत केले. मात्र त्यांच्या भाषणात जगताप यांची सोबत करण्याची घोषणा असली तरी "आम्हीही निवडणूकीला तयार आहोत' हा अप्रत्यक्ष संदेशही लपलेला आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com