rajendra mirgane appointed as deputy chair person | Sarkarnama

गृहनिर्माण मंडळाला गती; राजेंद्र मिरगणे सहअध्यक्ष

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नवी मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत राज्यात सुरु असलेल्या घरकुलांच्या बांधकामांना गती मिळावी. निश्चित केलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्याच्या सहअध्यक्षपदी राजेंद्र मिरगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नवी मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत राज्यात सुरु असलेल्या घरकुलांच्या बांधकामांना गती मिळावी. निश्चित केलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्याच्या सहअध्यक्षपदी राजेंद्र मिरगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

या महामंडळाची कार्ये, उद्दिष्ट्ये आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या असून त्यात राज्यशासनाच्या पुर्वमान्यतेने परवडणाऱ्या घरांच्या मोठया प्रकल्पाची उभारणी करण्याकरीता योजना तयार करणे, आर्थिकदृष्टया दृबल घटक, अल्प उत्पन गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्याकरीता सन २०२२ पर्यत पाच लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करायची आहे, प्रत्येक प्रकल्प हा किमान ५ हजार घरकुलांचा असणार आहे.

 तसेच पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांचे वितरण,योग्य आणि पारदर्शकपणे होत असल्याबाबत खात्री करणे, जलद आणि टिकाऊ परवडणाऱ्या घरांच्या उभारणीकरिता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ही सर्व कामे जलद गतीनेआणि वेळेत पार पाडण्यासाठी आवश्यक निधीची उभारणी, या नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाला करावी लागणार आहे.
 

महामंडळाचे मुख्यालय नवी मुंबई असणार असून महामंडळाचे कार्यक्षेत्र हे संपुर्ण महाराष्ट्र असणार आहे. या महामंडळाचा कालावधी हा सन २०२२ पर्यत किंवा प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) सुरु असेपर्यत राहणार आहे.

या महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असुन गृहनिर्माण मंत्री अतिरिक्त अध्यक्ष आहेत. संचालक म्हणुन अतिरिक्त मुख्य सचिव (गृहनिर्माण), प्रधान सचिव(नवी-२) म्हाडाचे उपाध्यक्ष, झोपूचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवशाही पुर्नवसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक, सभापती नागपूर सुधार प्रन्यास, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, सिडकोचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन अशासकीय सदस्य उद्योगक्षेत्रातील  दोन तज्ज्ञ काम पाहणार आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम करणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख