आजचा वाढदिवस : डॉ. राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष, भाजप, नागपूर ग्रामीण

नागपूर ग्रामीणचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खोलापूर येथे झाला. 10वीच्या परीक्षेत ते विदर्भातून 30वे मेरीट होते. नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहील्या 25 विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा नंबर लागला होता. महाविद्यालयीन जिवनापासूनचत्यांना विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांना रुची होती.
आजचा वाढदिवस : डॉ. राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष, भाजप, नागपूर ग्रामीण

नागपूर ग्रामीणचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खोलापूर येथे झाला. 10वीच्या परीक्षेत ते विदर्भातून 30वे मेरीट होते. नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहील्या 25 विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा नंबर लागला होता. महाविद्यालयीन जिवनापासूनच त्यांना विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांना रुची होती.

1979 मध्ये त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सचिवपदाची निवडणूक लढविली आणि 200 विद्यार्थ्यांच्या तुकडीत विद्यार्थी नेता म्हणून ओळख मिळविली, विद्यापीठ विद्यार्थी चळवळीत सहभागी झाले. विशेष आवड म्हणून त्यांनी राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इंग्रजी या विषयांत बी.ए. केले. 1982 मध्ये एमबीबीएसची पदवी मिळवीली. 

1987 मध्ये त्यांनी डॉ. वर्षा यांच्यासोबत आंतरजातीय नोंदणी पद्धतीने विवाह केला. 1990 मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन कळमेश्‍वरला खासगी वैद्यकीय सेवा सुरु केली.
1992 मध्ये ते भाजपचे सदस्य बनले. 2000 ते 2003 मध्ये कळमेश्‍वर तालुकाध्यक्ष झाले. 2002 मध्ये त्यांनी पहील्यांदा कळमेश्‍वर नगरपालिकेत भाजप-सेना युतीची सत्ता आणली. या निवडणुकीत भाजपचे सर्व 9 सदस्य निवडून आले होते. त्यानंतर जिल्हा भाजपची विविध पदे भुषवित कार्यरत. 2013
पासून ते भाजपचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com