Rajasthan CM Ashok Gehlot - Congress MLA From Maharashtra Hiraman Khoskar
Rajasthan CM Ashok Gehlot - Congress MLA From Maharashtra Hiraman Khoskar

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतला जयपूरला काँग्रेस आमदारांचा क्लास

पाच दिवस काँग्रेसचे आमदार जयपूरला होते. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमचा ख-या अर्थाने विद्यार्थ्यासारखा क्लास घेऊन काँग्रेसचे महत्व समजावून सांगितले, अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली.

नाशिक : पाच दिवस काँग्रेसचे आमदार जयपूरला होते. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमचा ख-या अर्थाने विद्यार्थ्यासारखा क्लास घेऊन काँग्रेसचे महत्व समजावून सांगितले, अशी माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली.

महाराष्ट्रात सत्तेचा खेळ सुरू आहे. त्यात भाजपकडून आमदारांची फोडाफोडी होणार असे संकेत मिळत होते. या पार्श्वभूमीवर आपले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस आमदार पाच दिवस जयपूरला एका हॉटेलमध्ये होते. यासंदर्भात आमदार हिरामण खोसकर म्हणाले, "या पाच दिवसात आम्ही सर्व आमदार एकत्र होते. या कालावधीत अनेक नेते भेटले. त्यात आम्हाला लक्षात राहिले ते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत. गेहलोत यांनी आमची प्रत्येकाची विचारपुस केली. गप्पा मारल्या. भाषण देखील दिले. या कालावधीत गेहलोत यांनी आम्हाला काॅग्रेस पक्ष व आजच्या स्थितीत किती महत्वाचे आहेत हे समजावून सांगितले''. 

''गेल्या पाच वर्षांत काँग्रेस पक्ष सत्तेत नव्हता. त्यामुळे एक वेगळा पक्ष, व्यक्तीकेंद्रित सरकार अस्तित्वात होते त्याने देशाचे किती नुकसान झाले हे आपल्यापुढे आहे. काँग्रेस पक्ष गरीब व देशाच्या विकासासाठी काम करीत आला आहे. त्याचा अभ्यास करावा. त्यातुन मतदारसंघासाठी काम करावे. जो एकनिष्ठ राहतो जनता त्याच्याबरोबर राहते,'' असेही गेहलोत यांनी सांगितल्याचे व अशा अनेक गोष्टी समजल्या आणि एक वेगळा अनुभव मिळाल्याचे खोसकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com