rajashri shahu abhivadan in parliament | Sarkarnama

116 वर्षांपुर्वी दिलेल्या आरक्षणाची आठवण; संसदेत शाहूंना अभिवादन! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

राजर्षी शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी 50 टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला. या घटनेला 116 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी संसदेतील शाहू महाराजांच्या पुतळ्यांसमोर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला सर्वपक्षिय खासदारांनी हजेरी लावली. 

पुणे : राजर्षी शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी 50 टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला. या घटनेला 116 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी संसदेतील शाहू महाराजांच्या पुतळ्यांसमोर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला सर्वपक्षिय खासदारांनी हजेरी लावली. 

केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक, खासदार संजय धोत्रे, खासदार आनंदराव आडसूळ, खासदार श्रीरंग बारणे, खासदार हेमंत गोडसे, खासदार रक्षा गोडसे, खासदार हीना गावीत उपस्थित होते. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पक्षीय राजकारण सोडून संसदेच्या प्रांगणात असलेल्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी व महाराष्ट्रात चाललेले आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे ही विनंती करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना एकत्रीत यावे म्हणून आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत आज संसदेच्या प्रांगणात सर्वपक्षीय खासदार उपस्थित होते.  - खासदार संभाजीराजे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख