rajashri ghule will be next president of nagar zp | Sarkarnama

नगर झेडपीच्या अध्यक्षपदासाठी राजश्री घुले, उपाध्यक्षासाठी प्रताप शेळके यांचे नाव निश्चित

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीच्या निकालासाठी काही तासावरच आला असताना महाआघाडीच्या नेत्यांची येथील एका हॉटेलमध्ये बैठक होऊन अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, तर उपाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांची नावे निश्चित करण्यात आली आहे.

नगर ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीच्या निकालासाठी काही तासावरच आला असताना महाआघाडीच्या नेत्यांची येथील एका हॉटेलमध्ये बैठक होऊन अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले, तर उपाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांची नावे निश्चित करण्यात आली आहे.

सकाळी 12 पर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत नावे निश्चित करण्यात आली असून, निवड प्रक्रीया लगेचच जिल्हा परिषदेत सुरू आहे. या बैठकिस राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अंकुश काकडे, तसेच कॉंग्रेसचे सत्यजीत तांबे आदी मान्यवर नेते उपस्थित होते.

राजश्री घुले या माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे घुले कुटुंब एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जातात. यापूर्वी चंद्रशेखर घुले यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी न घेता इतर उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. तसेच भाजपचे वारे असतानाही राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी घुले यांचे योगदान महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे राजश्री घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

उपाध्यक्षपदी नाव निश्चित झालेले प्रताप शेळके हे कॉंग्रेसचे दिवंगत नेते दादापाटील शेळके यांचे पूत्र असून, शेळके यांचे कॉंग्रेस नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार यांच्याशी सुरुवातीपासून चांगले संबंध होते. तसेच शेळके हे थोरात गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पदासाठी प्रारंभी श्रीगोंद्यातील अनुराधा नागवडे यांचे नाव पुढे आले होते, तथापि, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपला साथ दिल्याने त्यांचे नाव अखेर मागे पडले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख