rajaram patil gets presidential award second time | Sarkarnama

आर. आऱ. पाटलांचे बंधू ACP राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक

संपत मोरे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पुणे : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील हे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी ठरले आहेत. सध्या ते सहायक पोलीस आयुक्त म्हणून  पिंपरी चिंचवड  कार्यरत आहेत.

पोलिस खात्यात आर आर पाटील हे तात्या नावाने ओळखले जातात. माजी खासदार राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या 'शिवार ते संसद' या पुस्तकात त्यांचा विशेष उल्लेख केला आहे. शेट्टी यांनी पाटील यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दलचा एक प्रसंग त्यात रेखाटला आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांच्या  घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसाना  राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत.

राज्यातील  पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील पोलिस आयुक्त मिंलिद खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे सहाय्यक कमांडंट हरिश्चंद्र काळे या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख