धनंजय मुंडेंच्या जागेवर भाजपची यांना उमेदवारी !  - rajan teli bjp candidate for mlc | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडेंच्या जागेवर भाजपची यांना उमेदवारी ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 जानेवारी 2020

मुंबई : विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेकरिता होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी आज भाजपच्या वतीने राजन तेली यांनी आपला उमेवारी अर्ज दाखल केला. 

तर या जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे. तेली रिंगणात उतरल्याने सामना चांगलाच रंगणार असल्याचे चित्र आहे. 

निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांच्याकडे आज तेली यांनी अर्ज दाखल केला. यावेळी विधानरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर,आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपचे नेते विनोद तावडे उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख