MLC मिळाली तरी समाधान आणि नाही मिळाली तरी समाधान!

विधानसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा तरुणाई राजन पाटील यांना संधी द्या, अशी मागणी करताना दिसत आहे.
MLC मिळाली तरी समाधान आणि नाही मिळाली तरी समाधान!

पुणे : "मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. शरद पवार हे माझे आदर्श आहेत. त्यांच्यासोबत रहायचे आणि त्यांना साथ द्यायची एवढंच मला माहिती आहे. आगामी काळात संधी मिळाली तरी समाधान आणि नाही मिळाली तरी समाधान..." अशा भावना मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केल्या.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना रक्ताने पत्र पाठवून 'राजन पाटील यांना विधानपरिषदेचे आमदार करा आणि त्यांना विरोधी पक्षनेते पद द्या  अशी मागणी केली होती. त्यांनतर सोशल मीडियावर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी 'राजन पाटील यांना संधी द्या'अशी जोरदार मागणी केली.

राजन पाटील यांनी मोहोळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2009 ला मतदारसंघ राखीव झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना आघाडी  देणारा एकमेव मतदारसंघ मोहोळच होता. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत यशवंत माने यांच्या विजयात राजन पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. 

पक्ष अडचणीत असताना राजन पाटील यांनी पक्ष सोडला नाही, याचे कौतुक तरुणाईला असल्याचा एक प्रसंग सातारा येथे घडला होता. साताऱ्यात ज्या दिवशी शरद पवार यांची रॅली होती. त्यादिवशी पवार यांना भेटायला राजन पाटील आले होते. गर्दीमुळे पाटील स्टेजवर न जाताच बाहेर एका बाजूला थांबले होते. एका तरुणाचे त्यांच्याकडे लक्ष गेल्यावर त्यांना भेटायला आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढायला गर्दी झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com