शरद पवार म्हणाले, `सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार द्या' 

सोलापूर जिल्हा परिषदेवर शेकापसह महाविकास आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी मी राज्यातील सर्वपक्ष प्रमुखांशी चर्चा करतो. जिल्हा परिषदेत सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार द्या अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला केली.
शरद पवार म्हणाले, `सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार द्या' 

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेवर शेकापसह महाविकास आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी मी राज्यातील सर्वपक्ष प्रमुखांशी चर्चा करतो. जिल्हा परिषदेत सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार द्या अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला केली. 

मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या विजयी सत्कार सोहळ्यासाठी वेळ मिळावी यासाठी आज माजी आमदार राजन पाटील यांनी बारामती येथे पवारांची भेट घेतली. या भेटीत सत्कार सोहळ्यासोबतच संभाव्य अध्यक्ष निवडीबाबतही चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी आपण स्वतः: चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. बुधवारी (ता. 18) शरद पवार हे नागपूरला रवाना होणार असून त्या ठिकाणी अध्यक्ष निवडीबाबत प्रमुख नेत्यांसोबत बैठक होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषदेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी समविचारी आणि भाजप एकवटले आहेत. या गटाच्याही बैठका सुरू असून उद्या (सोमवारी) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह जिल्ह्यातील भाजप व समविचारीच्या नेत्यांसोबत ही बैठक होणार असून या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. 

माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेले सदस्य अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीसोबतच राहतील असा मला विश्‍वास आहे. अध्यक्ष निवडीसाठी आम्ही रीतसर व्हिप बजावणार आहोत. विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर मोहोळमधील सत्कारासाठी शरद पवार यांनी आम्हाला वेळ देण्याचे मान्य केले आहे. 
- राजन पाटील, माजी आमदार 

महाविकास आघाडीची उद्या (सोमवार) होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक 25 डिसेंबरनंतर होण्याची शक्‍यता आहे. बैठक जरी पुढे ढकलली असली तरीही महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी अंतर्गत भेटीगाठी सुरू आहेत. 
- बळिराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com