raj tiakray | Sarkarnama

कुलभूषण जाधवांसाठी मनसेची बाईक रॅली

सुचिता रहाटे
सोमवार, 17 एप्रिल 2017

मुंबई : भारताचे माजी नौदलअधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक करून मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ नवी मुंबई मनसेकडून शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली काढण्यात आली. 

ही बाईक रॅली जुईनगर गणेश मैदान ते वाशी बस डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली होती. बाईक रॅलीच्या अगदी सुरुवातीला भारताचा तिरंगी झेंडा घेऊन भारतमाता की जय !!!, वंदे मातरम !!!, कुलभूषण जाधव यांची सुटका झालीच पाहिजे !!!!, पाकिस्तान मुर्दाबाद !!!! अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबई परिसर दणाणून सोडला.यावेळी मनसे शहर सचिव संदीप गलुगडे, उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले, विनोद पार्टे, रवींद्र वालावलकर, डॉ.आरती धुमाळ, अनिथा नायडू, प्रिया गोळे यांची पाकिस्तानच्या निषेधार्थ भाषणे झाली. 36 इंचांची छाती करत मिरविणाऱ्या राज्यकर्त्यांनी कुलभूषण जाधव यांना परत आणा असे म्हणत शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख