raj thakrey asks questions to fadnvis and ajit pawar | Sarkarnama

आमीरच्या वाॅटर कप स्पर्धेत राज ठाकरे यांचे फडणवीस, अजित पवार यांना पाणीदार प्रश्न

ज्ञानेश सावंत
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाण्याच्या प्रश्नावरून अनेक पाणीदार प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अनेक मंत्री व्यासपीठावर असताना विचारले.  राज यांनी बिनपाण्याने आधीच्या आणि आताच्या सरकारची कोंडी केली, असेच त्यांचे हे प्रश्न होते.

अभिनेते आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेचा समारोप आज पुण्यात बालेवाडी येथे झाला. अनेक दिग्गज मंडळी या वेळी उपस्थित होती. राज यांनी आतापर्यंत सिंचनाचा सर्व पैसा कुठे गेला, असा सवाल केला. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून ते  आता २०१८ पर्यंत सिंचनासाठीचा निधी मुरला नसत तर आज महाराष्ट्र पाणीदार झाला असता, असा टोला त्यांनी मारला. ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकाला पाण्याचं महत्त्व कळालं आहे. यासाठी आमीर खान काम करत असेल तर सरकार काय करतं, असाही सवाल त्यांनी फडणवीस यांच्यासमोरच उपस्थित केला.

हे व्यासपीठ राजकीय मतभेद काढण्याची नाही, असे स्पष्ट केले तरी त्यांच्या या प्रश्नांमुळे नेत्यांची कोंडी झाली. पाणी फाऊंडेशनाच्या कामात सरकारी अधिकारी काम करत असतील तर सरकारी कामात ते  का सहभागी होत नाहीत, असाही प्रश्न त्यांनी विचारला. माझे प्रश्न साधे आणि सरळ आहेत. पाणी फाऊंडेशनच्या कामात शरद पवार, फडवणीस यांचा वाटा आहे. मग सरकार हे का करत नाही, असेही त्यांनी जाताजाता विचारले.

आमीर खान हे कोणतेही पुरस्कार स्वीकारत नाहीत. तरी त्यांनी पाण्यासाठी केलेल्या कामाची दखल रॅमन मॅगसेसे पुरस्काराने घेतली तर तो पुरस्कार नक्की घे, असा सल्लाही त्यांनी केला.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख