raj thakre and aurangabad | Sarkarnama

राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अर्ध्यावर ; उद्याच मुंबईला परतणार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला दौरा एक दिवस आधीच संपवून मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मन सैनिकांच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. औरंगाबादचे संभाजीनगर हा नामकरणाचा शिवसेनेचा मुद्दा हायजॅक करत मनसेने गुरुवारी औरंगाबादेत राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले होते. 

राज यांच्या औरंगाबाद दौऱ्यानिमित्त मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. या तीन दिवसांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन देखील मनसेच्यावतीने करण्यात आले होते. शिवसेना - भाजपमधील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश , कार्यकर्त्यांचा मेळावा , समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका असे भरगच शेडूल असताना राज ठाकरे मात्र उद्या सकाळीच मुंबईला प्रयत्न असल्याची माहिती समोर आली आहे. 

त्यामुळे राज ठाकरेंनी काही कार्यक्रम आधीच उरकून घेत पदाधिकारी मेळाव्याला आपण हजर राहणार नसल्याचे मनसेच्या स्थानिक नेत्यांना स्पष्ट केले आहे. याशिवाय शिवसेना -भाजपमधून मनसेत प्रवेश करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना थोडे थांबा असे सांगण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पूर्वनियोजित दौरा आधीच गुंडाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता राज ठाकरे यांची उद्या कृष्णकुंजवर महत्त्वाची बैठक असल्यामुळे त्यांनी औरंगाबादचा दौरा एक दिवस आधीच संपवल्याचे सांगण्यात येत आहे . 

दरम्यान महापालिकेच्या निवडणुकीत संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज ठाकरे यांनी पाच सदस्यीय समिती नेमली आहे. निवडणुकी संदर्भातील सर्व आढावा, इच्छुक उमेदवारांच्या याद्या ही सर्व माहिती या समितीमार्फत राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख