Raj.
Raj.

गर्दी पाहून राज ठाकरे उत्साहात; नवरात्रीनंतर सभा घेण्याचा दिला शब्द

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याचे नियोजन कात टाकून केल्याचे दिसले. छोटेखानी कार्यक्रमाला गर्दी पाहून राज ठाकरेंनाही उत्साह आला. या दौऱ्याने मनसेला आगामी काळात उभारी मिळेल असा अंदाज बांधला जात आहे.

केज : मधल्या काळात राज्यभरच मनसेची रेलगाडी रुळावरुन घसरल्याने जिल्ह्यातही मनसेला चांगलीच मरगळ आली होती. मात्र, शुक्रवारच्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मनसेची मरगळ दुर झाल्याचे दिलासादायक चित्र दिसले. अगदी गर्दी पाहून राज ठाकरेही उल्हासित झाले आणि गणपती, नवरात्र संपल्यानंतर सभा घेण्याचा शब्द त्यांनी दिला. 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यात जिल्हा प्रमुख सुमंत धस यांच्या केज येथील कार्यालयाचे उद॒घाटन होते. रुंदीकरण कामासाठी वर्षापासून रस्ता उखडून ठेवलेला रस्ता तसाच असल्याने ठाकरेंना मार्ग बदलून केजला पोचावे लागले. त्याचाही छोटेखानी भाषणात उल्लेख करत राज ठाकरेंनी ‘काही ठिकाणी नवीन रस्ते आणि कुठे जुनेच खड्डे’ असा उल्लेख केला. दरम्यान, केजमध्ये त्यांच्या हस्ते मनसेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. या महिलांशी राज ठाकरेंनी संवाद साधला. 

दरम्यान, मनसे कार्यालय उद॒घाटन कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहून राज ठाकरेंना चांगलाच उत्साह आल्याचे दिसले. सभा नसताना झालेली गर्दी पाहून ‘तुमचे दर्शन झाले हेच आपले भाग्य आहे’, असे सांगत गणपती, नवरात्र संपताच सभा घेण्याचा शब्द त्यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com