Raj Thakray criticizes Narendra Modi | Sarkarnama

महाराष्ट्राचे तुम्ही पहारेकरी बना पण मोदींसारखे नको  : राज ठाकरे 

सरकारनामा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

महाराष्ट्र  आणि मुंबईत बांगला  देशातील लोक बेकायदेशीरपणे राहत आहेत .  आपल्याला कल्पना नाही आपण कोणत्या सुरूंगावर बसलोय . कधी वाट पेटेल आणि कधी धुडूम्म  आवाज येईल याचा नेम नाही . आपण मात्र व्हाट्स अप आणि टीव्ही पाहत बेसावध आहोत . महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी आणि कर्मचाऱयांनी मनावर घेतले तर या परकीयांच्या वसाहती फोफावणार नाहीत . "

नवी मुंबई : " महाराष्ट्राचे तुम्ही पहारेकरी बना पण मोदींसारखे नको . मोदी म्हणाले होते मी देशाचा पहारेकरी बनेन . पण त्यांनी काय केले आपण पाहतच आहोत . तुम्ही तसे करू नका . मराठी माणसाच्या हिताचे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी रक्षण करावे . तुम्ही महाराष्ट्रासाठी जागता पहारा देणार साल तर मी तुमच्या प्रश्नकडे लक्ष देईन , नाहीतर अजिबात देणार नाही," असे आवाहन राज ठाकरे यांनी महानगर पालिका कर्मचारी मेळाव्यात केले . 

राज ठाकरे म्हणाले ,  "  बांगला  देशातून येणारी माणसे मुंबई सारख्या महानगरात येतात . इथलीच माणसे त्यांना सरकारी जागेवर झोपडपट्ट्या वसवून राहायला जागा देतात . मग ही झोपडपट्टी योजना एसआरए योजनेत घालून यांना पक्की घरे आणि नेत्यांना - बिल्डरांना पैसा मिळतो . महानगरपालिकांचे अधिकारी कर्मचारी जर जागरूक असतील तर सरकारी आणि महानगरपालिकांच्या भूखंडांवर अशी अतिक्रमणे होणारच नाहीत . तुम्ही फक्त स्वतःचा विचार करू नका . आपल्या शहराचे , समाजाची आणि देशाचे आपण काही देणे लागतो  ही भावना ठेवून काम करा . कोणी असे भूखंड हडप करू लागले तर वेळीच आम्हाला सांगा आम्ही त्यांचा बंदोबस्त करू . तुम्ही समाजासाठी आणि शहरासाठी काही करणार असाल तरच मी तुमच्या मागण्यासाठी आवाज उठवेन  नाही तर मला इतर भरपूर कामे आहेत . "

राज ठाकरे पुढे म्हणाले , "  रोजगारासाठी येणाऱ्या लोंढ्यांमुळे महानगरे बेसुमार वाढत आहेत . पैशा खडखडाट आहे . महानगपालिकांचा कर रूपाने येणाऱ्या पैश्यातील ८० टक्के पैसा कर्मचार्यांच्या  वेतनावर खर्च होतो मग विकास कामे कुठून करणार ? कोणीही कठोर कडवट निर्णय घेत नाही . सर्वाना खुश ठेवायचे तर हाती काही लागणार नाही . परवा मी औरंगाबादला गेलो तर तिथे कचऱ्याचे ढीग जागोजागे लागलेले . कर्मचारी काय करताहेत ?  तुम्ही मनावर घ्या . " 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख