Raj Thakray Criticism on Narendra Modi | Sarkarnama

पंतप्रधान मोदी जनतेला वेठीस धरतात : राज ठाकरे 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

"कल्याण येथे घडलेला मंगळवारचा प्रसंग लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला वेठीस धरत आहेत. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मनसे सर्व ताकदीनिशी उतरणार आहे. एकदा माझ्या हातात सत्ता देऊन पाहा. बदल निश्‍चित घडवून दाखवेन," असा विश्‍वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

नाशिक : "कल्याण येथे घडलेला मंगळवारचा प्रसंग लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला वेठीस धरत आहेत. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मनसे सर्व ताकदीनिशी उतरणार आहे. एकदा माझ्या हातात सत्ता देऊन पाहा. बदल निश्‍चित घडवून दाखवेन," असा विश्‍वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

ठाकरे 2008 मध्ये परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाविषयी दाखल फौजदारी खटल्याच्या सुनावणीसाठी येथे आले होते. यावेळी त्यांनी इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "देशात व राज्यात काँग्रेस आघाडी सरकारला लोक कंटाळले होते. त्यावेळी एक भला माणूस म्हणून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करावे, हे मी सर्वप्रथम मांडले होते. देशात काही बदल होईल असे वाटले होते. मात्र 'सब घोडे बारा टक्के' निघाले." 

ते पुढे म्हणाले, "इगतपुरीचा परिसर अत्यंत सुंदर आहे. मात्र येथे काही शिल्लकच ठेवायचे नाही असा सरकारने चंगच बाधला आहे असे दिसते. मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात भुसंपादन, बेसुमार वृक्षतोड, पर्यटनाकडे दुर्लक्ष आणि अन्य समस्यांनी येथील सौंदर्य नष्ट चालले आहे. हा तालुका भाताचे आगार आहे. मात्र गेल्या सत्तर वर्षात भाताला हमीभाव मिळालेला नाही." यावेळी "मनसे'चे नेते बाळा नांदगावकर. अविनाश अभ्यंकर, अॅड राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, ऍड रतनकुमार इचम आदी नेते उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख