न्यू होरायझन इंस्टिट्यूटला मनसेचा दणका

 न्यू होरायझन इंस्टिट्यूटला मनसेचा दणका

मुंबई : नवी मुंबई ऐरोली येथील न्यू होरायझन इन्स्टिट्यूटला आज मनसेनेदणका दिलाय. या इंस्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांवर बारा हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व अभयसक्रमा व्यतिरिक्त कोर्सची सक्ती करण्यात येत होती. त्यामुळे इंस्टिट्यूटमधील संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी कॉलेजची तक्रार मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडे केली होती. तक्रारीवरून मनसेचे शिष्टमंडळ उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली न्यू होरायझन कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज प्रशासनाला धारेवर धरले. कॉलेजचे संचालक व्ही.जयरामन यांनी आपली चूक मान्य करत सदर बारा हजार रुपये शुल्कातून कमी करण्याचे आश्वासन दिले. 

ऐरोली स्थित न्यू होरायझन इन्स्टिट्यूटमध्ये "बॅचलर ऑफ अकाउंट अँड फायनान्स"च्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाने अभ्यासक्रमा व्यतिरिक्त कोर्स व किमान बारा हजार रुपये शैक्षणिक साहित्यासाठी भरणे बंधनकारक केले होते. तसेच कॉलेज प्रशासन वार्षिक शुल्कामध्ये बारा हजार रुपयांचे अतिरिक्त शुल्क विद्यार्थ्यांकडून लाटत होते. कॉलेजचे संचालक श्री.व्ही.जयरामन यांनी हे कोर्स विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कसे उपयुक्त आहेत हे पटवून देण्याचा प्रयन्त केला परंतु मनसे विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे व सनप्रीत तुर्मेकर यांनी आक्रमकपणे पालकांची बाजू मांडली व कॉलेजचे संचालक श्री.व्ही.जयरामन यांच्याकडून शैक्षणिक साहित्य व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कोर्सेस चे शुल्क रद्द करण्यास मान्य करून घेतले. 

यावेळी मनसेच्या शिष्टमंडळातील उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले, विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेक्र, प्रेम दुबे, प्रिंस सिंग, रोजगार विभागाचे रूपेश कदम, अप्पासाहेब कोठुळे, शाखा अध्यक्ष विराट श्रुंगारे आदी उपस्थित होते. 

नवी मुंबईत मोठ्या संख्येने शाळा व कॉलेज पालकांना असे बेकायदेशीरपणे शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली शुल्क भरण्यास भाग पडत असल्याचे मनसेचे उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांनी सांगितले आहे. पालकांनी अशा शाळा कॉलेज विरोधात मनसेकडे 9664278717, 9664848007 या क्रमांकांवर तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. 

"शालेय आणि उच शिक्षण विभागाचे महाविद्यालयांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे.तसेच महाविद्यालयांवर देणगी प्रतिबंधक कायदा व प्रचार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद व नियम शिक्षण मंत्र्यांनी करावेत, अशी मागणी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे. 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com