विधानसभा निवडणुकीबाबत राज यांचा अद्याप निर्णय नाहीच...

विधानसभा निवडणुकीबाबत राज यांचा अद्याप निर्णय नाहीच...

पुणे : कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामावून घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. स्वाभिमानी शेकतरी संघटनेसोबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वबळावर विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घाईचा होईल, असा विचार करून स्वबळावर लढण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज जाहीर केला नाही, असे पक्षातील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

मनसे स्वबळावर निवडणुका लढणार या चर्चेच्या पार्श्‍वभमूीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय अद्याप झाला नाही, असे आज पुण्यात सांगितले. पक्षाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीला आज पुण्यात प्रारंभ झाला. यावेळी ठाकरे यांनी ही भूमिका जाहीर केली. लोकसभा निवडणुकीवेळीच कॉंग्रेस आघाडीत जाण्याची ठाकरे यांची मानसिकता होती. राष्ट्रवादीची तयारी होती. मात्र, कॉंग्रेसने मनसेला सोबत घेण्यास विरोध केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांचादेखील आघाडीसोबत जाण्यास मनोमन विरोध होता. 

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर तटस्थ राहण्याची भूमिका घेत ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जंगी सभा घेतल्या. या सभांचा कुणालाच फायदा झाला नाही. मात्र, ठाकरे यांची देशभर चर्चा झाली. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणूक मनसेने गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. मात्र, एकट्याच्या ताकदीवर लढून उपयोग नाही, हे लक्षात आल्याने कॉंग्रेस आघाडी, स्वाभीमानी शेतकरी संघटनेसोबत जाण्याचा मनसेचा विचार असावा. मात्र, मनसेबाबत कॉंग्रेसचा विरोध टोकाचा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्या भूमिकेत काही फरक झाला असेल तर मनसेला कॉंग्रेस आघाडीत प्रवेश मिळू शकतो. या संदर्भातील कोणतेच चित्र अद्याप स्पष्ट होत नसल्याने मनसेप्रमुख ठाकरे यांनी स्वबळाची चर्चा सुरू करून दिली असावी, असे राजकीय तज्ञ सांगत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com