raj thakare`s slogan on t shirt | Sarkarnama

टी शर्टवर झळकले....ए लावरे तो व्हिडिओ!

अन्वर मोमीन
मंगळवार, 14 मे 2019

वडगाव शेरी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे `ए लावरे तो व्हिडिओ` हे वाक्य चांगलेच गाजले होते. सत्ताधाऱ्यांच्या अनेक योजना त्यांनी व्हिडिओ दाखवून उघड्या पाडल्या.

सोशल मीडियावर यावर उलटसुलट चर्चाही झाली होती.  आता पुन्हा एकदा हे वाक्य चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे हे वाक्य लिहिलेले टी-शर्ट आता क्रिकेट खेळाडू घालणार आहेत. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या नवनिर्माण चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.

याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आणि स्पर्धेचे आयोजक कल्पेश यादव म्हणाले, ``तरुण वर्ग हा राज ठाकरे यांचा मोठा चाहता आहे.  राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने भाजप-शिवसेनेच्या फसव्या योजनांची चिरफाड केली आणि त्यासाठी पुरावा म्हणून व्हिडिओ दाखवले ही गोष्ट तरुणांना खूप आवडली.  त्यामुळे तरुण खेळाडूंच्या मागणी वरूनच आम्ही अशा प्रकारच्या टी-शर्टची छपाई केली आहे. 

पुण्यातील येरवडा भागात नवनिर्माण चषक क्रिकेट स्पर्धा 15 मे पासून सुरू होत आहेत. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांसाठी मोठ्या रकमेची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता क्रिकेट खेळण्यासाठी आलेले राज्यभरातील खेळाडू आणि क्रिकेट सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक या दोघांनाही टी-शर्टवरील ए लावरे तो व्हिडिओ हे वाक्य नजरेस पडणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून गोट्या अंपायर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याने ही स्पर्धा चांगलीच चर्चेत राहणार आहे.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख