निवडणुक लढविण्याबाबत राज ठाकरेंचा निर्णय होईना  

raj_thakrey
raj_thakrey

मुंबई :  लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाही ईव्हीएम यंत्रे वापरण्यात येणार असल्याने त्यात सहभागी न होण्याच्या विचारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अदयाप ठाम आहेत.

महाराष्ट्रातील या सर्वाधिक लोकप्रिय नेत्याने या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बडया नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न युध्दस्तरावर सुरू केले आहेत.

दरम्यान आज झालेल्या बैठकीत मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अस्वस्थता जाहीर केली.निवडणूक लढवायची नाही असे राजकीय पक्षाने कसे करून चालेल असा विचारही यावेळी पुढे आला. राज यांनी सर्वांचे ऐकून घेतल्याचेही कळले.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राज यांचे विश्‍वासू सहकारी बाळा नांदगावकर यांनी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले.मात्र मनसेने मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला तर राज यांचे निकटवर्तीयही बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे बोलले जाते आहे.  

निवडणुकीत सहभागी होण्याऐवजी मतयंत्राला विरोध करणारे जनआंदोलन सुरू करावे असा राज यांचा प्रस्ताव आहे. पूर्वी जाहीर मंचावर मांडलेली ही भूमिका राज यांनी कायम ठेवली आहे. विश्‍वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज झालेल्या मनसेच्या बैठकीत त्यांनी हाच विचार पुन्हा एकदा ध्वनित केला .

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उतरवता केवळ महत्वाच्या मतदारसंघात सभा घेतल्या होत्या. राज यांच्या मनसेला आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरू केले होते, त्यांना यश येत असल्यानेच दिल्लीत कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. मात्र मैदानात उतरणेच नको अशी भूमिका कायम राहिल्यास अडचणीत आलेल्या विरोधकांच्या हातातील हुकुमाचा पत्ताही हरवून बसेल अशी चिंता व्यक्‍त केली जाते आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com