राज ठाकरेंचे सध्या 'वेट ऍण्ड वॉच',योग्यवेळी बोलणार 

बाळा नांदगावकर यांनी यावेळी उद्धव ठाकरे सरकारवर चांगलेच आसूड ओढले. शपथविधी होऊन दोन आठवडे झाले तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. हे लोकांना आवडलेलं नाही. -बाळा नांदगावकर
Raj Thackeray is in wait and watch mood
Raj Thackeray is in wait and watch mood

मुंबई  : नवीन सरकारमध्ये सावळागोंधळ सुरू असून हे जनतेला फारसं रुचलेलं नाही.याबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी आजची बैठक बोलावल्याचे सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारच्या कामगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.


आम्ही सध्या 'वेट ऍण्ड वॉच'च्या भूमिकेत असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे योग्य वेळी बोलतील अस ही त्यांनी सांगितले.


विधानसभा निवडणुकीनंतर मनसेच्या राजगड या मध्यवर्ती कार्यालयात महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीला नेते बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई,अविनाश अभ्यंकर उपस्थित होते. 


सरकारमध्ये सुरू असलेल्या सावळा गोंधळा बाबत पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यात आली.त्याचप्रमाणे नवी मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली, धुळे, वाशीम, नंदुरबार आदी ठिकाणच्या येऊ घातलेल्या निवडणुकांबाबत ही चर्चा करण्यात आली.


बाळा नांदगावकर यांनी यावेळी उद्धव ठाकरे सरकारवर चांगलेच आसूड ओढले. शपथविधी होऊन दोन आठवडे झाले तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. हे लोकांना आवडलेलं नसून आमच्या ही मनाला रुचलेलं नाही. हिवाळी अधिवेशन जवळ आलेलं आहे मात्र त्याबद्दल ही अद्याप काही घोषणा नाही.

याबाबत आपल्या पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी बैठक घेतली.आम्ही सध्या तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असून या सरकारबाबतची पुढील भूमिका राज ठाकरे जाहीर करणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

मनसे भरवणार महाअधिवेशन

राज्यात येऊ घातलेल्या वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्ताने मनसेने पुन्हा कार्यरत होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सरकारमधील खाते वाटप रखडल्याने जनतेमध्ये रोष व्यक्त होत आहे.यामुळे राज्यातील बेरीजगारी,शेतकरी आत्महत्या,कर्जमाफी यांसारख्या विषयांकडे दुर्लक्ष होतंय.

 
यासारख्या विषयांवर आक्रमक होण्यासाठी आणि पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी महाधिवेशन बोलावण्याचा निर्णय मनसेने आजच्या बैठकीत घेतला.हे अधिवेशन लवकरच बोलावण्यात येणार असून अधिवेशन शहरी भागात घ्यावे की ग्रामीण भागात याबाबत अद्याप संभ्रम आहे .पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com