राज ठाकरे घेणार ममता बॅनर्जींची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईव्हीएम विरोधात आक्रमक झाले असून येत्या बुधवारी (31 जुलै) ते तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत. ईव्हीएम विरोधातील मोर्चेबांधणीसाठी देश पातळीवर मोठे आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत.
राज ठाकरे घेणार ममता बॅनर्जींची भेट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईव्हीएम विरोधात आक्रमक झाले असून येत्या बुधवारी (31 जुलै) ते तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत. ईव्हीएम विरोधातील मोर्चेबांधणीसाठी देश पातळीवर मोठे आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. 

याआधीही राज त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.राज ठाकरे ईव्हीएम विरोधात आक्रमक झाले आहेत.याचसाठी आज राज ठाकरे यांनी अजित पवार,जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा देखील केली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली होती.त्या भेटीत पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली होती.त्यानंतर त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती.

 राज ठाकरे उद्या पासून तीन दिवस कोलकाता दौऱ्यावर  निघणार असून बुधवारी (31 जुलै) ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते ममता बॅनर्जी यांना भेटून ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.यानंतर राज ठाकरे आणखी काही प्रमुख राजकीय नेत्यांची भेट देखील घेणार आहेत.लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी-शाहांविरोधात 'लाव रे तो व्हिडीओ'चे हत्यार उपसले  होते.त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या विरोधात रान उठवून भाजप-शिवसेनेच्या नाकी नऊ आणण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com