राज ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक वाक्यावर टाळ्या वाजवत  तरुणवर्गाचा प्रतिसाद 

कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेतील युतीमधील भाजप-सेना युती मधील बेबनावावर भाष्य करत आम्ही आपले ठणठणीत बरे असे राज यांनी सांगितले.
Raj Thakare in Kalyan
Raj Thakare in Kalyan

कल्याण   :पावसाचे सावट असतानाही राज ठाकरेंच्या सभेसाठी तरुणवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित होता . राज ठाकरेंच्या  भाषणातील प्रत्येक वाक्यावर टाळ्या वाजवत उस्फूर्त प्रतिसाद दिला.

ज्या शिवछत्रपतीं मुळे महाराष्ट्राची ओळख आहे त्यांचे अरबी समुद्रातील स्मारक बाजूला राहिले आणि चीनमधून तयार केलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक मात्र उभे राहिले हे नेमके काय चालले आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांसाठी राज यांनी कल्याणात जाहीर सभा घेतली. 


 भिवंडीहुन कल्याणला सभास्थानी येताना या वाहतूक कोंडीचा त्यांना सामना करावा लागला त्यावर त्यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. आपल्याबरोबर असलेल्या पोलिसांना सलाम करत त्यांनी या खड्ड्यातून सर्वसामान्य नागरिक कशी वाट काढतो यावर आश्चर्य व्यक्त केले.

 कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेतील युतीमधील भाजप-सेना युती मधील बेबनावावर भाष्य करत आम्ही आपले ठणठणीत बरे असे राज यांनी सांगितले. केंद्रातील सरकारवर टीका करत असतानाच राज यांनी राज्य सरकारच्या कामाच्या पद्धतीवरही तीव्र शब्दात भाष्य केले.  


अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर स्मारकाचे पुढे काय झाले? असा सवाल राज यांनी केला. आपण पण जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहोत. आपल्याला शिल्पकलेचे ही ज्ञान आहे, असे सांगत राज यांनी सरकारच्या घोषणेचे वाभाडे काढले. केंद्रातले आणि राज्यातले बडे नेते एकत्र येऊन समुद्रात या स्मारकासाठी भूमिपूजन केले. मात्र त्याचे पुढे काय झाले? असेही राज यांनी विचारले. चीन विरुद्ध देशात रान माजवले जात असतानाच सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा मात्र चीनमधून तयार करून कसा आणला गेला? असा प्रश्न राज यांनी केला.


 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या  विषयांमध्ये हात घातला त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला असे राज्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केले. सत्ताधाऱ्यांना खाटकांची उपमा देताना लहरीप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर शंभरवेळा विचार करायला लावणारा विरोधीपक्ष असावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी असे आवाहनही राज यांनी यावेळी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com