raj thakare and state election | Sarkarnama

मी ईडीच्या चौकशीला घाबरत नाही - राज ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मुंबई : लाखो रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे त्यांची चौकशी केली जात नाही आणि माझ्यामागे ईडीची चौकशी लावत आहेत पण मी निक्षून सांगतो की ईडीच्या चौकशीला मी घाबरत नाही असे खणखणीत प्रतिपादन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. नोटाबंदी आणि जीएसटी ही मोदी सरकारची चुकीची धोरणे आहेत. या सरकारच्या चुकीच्या धोरणाला कणखर विरोध करण्यासाठी मजबूत विरोधी पक्ष म्हणून मनसेला मतदान करा असे आवाहनही त्यांनी केले. 

मी आजतागायत कुठल्याही मंत्र्यांला माझे काही वैयक्तिक काम सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून मी थेट बोलू शकतो, इथल्या सरकारच्या काळात गेल्या चार वर्षात विरोधी पक्षाने काय केले तर इथले विरोधी पक्षनेतेच भाजपमध्ये गेले असे म्हणत त्यांनी भाजप आणि शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात मी एकट्याने बुलेट ट्रेनला विरोध केला. चांगला विरोधी पक्ष म्हणून मला मते द्या असे सांगणारा जगात मी एकटाच असेन असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख