raj thakare and state election | Sarkarnama

राज ठाकरेंनी ईव्हीएम, मोदी-शहांचे नावही घेतले नाही

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या सलामीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे साधे नावही घेतले नाही. 

राज ठाकरे यांची तोफ धडाडणार म्हणून जमलेल्या श्रोत्यांना राज ठाकरे केंद्र आणि राज्य सरकारवर तुटून पडतील अशी अपेक्षा होती. परंतु मोदी-शहा तर सोडाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव घेणे राज ठाकरे यांनी टाळले. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा "लाव रे तो व्हिडिओ', हा डायलॉग खूप गाजला होता. नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचे जुने संदर्भ असलेले व्हिडिओ दाखवून राज ठाकरे मोदींवर तडाखेबंद टीका करीत असत. 

या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना राज ठाकरे सरकारवर कशी टीका करतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. परंतु राज ठाकरे यांनी मनसेला राज्यात प्रबळ विरोधी पक्ष करण्याचे आवाहन केले. 

ईव्हीएम विरोधात मोहीम हाती घेतलेल्या राज ठाकरेंनी आज ईव्हीएमबाबतही सरकारवर हल्ला चढवला नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख