raj thakare and pune | Sarkarnama

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणात ना तोरा ना धाक...

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विरोधकांवर कशा पध्दतीने तोफ डागणार आणि पक्ष संघटनेत उत्साह निर्माण व्हावा म्हणून त्यांची नवी रणनीती काय असे, हे जाणून घेण्यासाठी राज यांच्या पुण्यातील मेळाव्याने कार्यकर्त्यांची गर्दी खेचली. मात्र, राज यांनी विरोधकच काय, तर आपल्या कार्यकर्त्यांना साधा नवा गुरूमंत्रही दिला नाही. राजकीय विरोधकांवर राज फारसे घसरले नाहीत. राज यांच्या 35 मिनिटांच्या भाषणात नेहमीचा "ना तोरा ना धाक' जाणवला. मराठी आणि अन्य मुद्दे मांडत "जुनीच कॅसेट" वाजवून राज यांनी आपले भाषण संपविले. 

आगामी निवडणुकांच्या तयारीकरिता राज हे राज्यभर दौरा करीत आहेत. मराठवाड्यातील दौरा आटोपून त्यांनी पुण्यात मेळावा घेतला. महापालिका निवडणुकीनंतर राज पहिल्यांदाच मेळावा घेणार असल्याने त्यांच्या भाषणाबाबत उत्सुकता होती. निवडणुकांचे वारे, बदलती राजकीय आणि सामाजिक परिरस्थिती या पार्श्‍वभूमीवर राज कोणता नवा मुद्दा मांडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

राज यांना ऐकण्यासाठी गणेश कला क्रीडा मंच भरले. या गर्दीतील बहुतांशी आकडा हा अगदी पंचविशीतला होता. त्यामुळे जल्लोषाचे वातावरण होते. राज यांचे आगमन होताच, टाळ्या आणि घोषणाबाजी करीत चाहत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर एक-दोन मिनिटांत राज बोलायला उभे राहिले, तेव्हाही टाळ्यांचा कडकडाट झाला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाची आठवण करून राज यांनी भाषणाला सुरवात केली. त्यामुळे त्यांचे भाषण धडाकेबाज होणार अशी आशा गर्दीला होती, पण, ती फार वेळ राहिली नाही. 

नेहमीप्रमाणे मराठी, स्थानिकांना नोकऱ्या, शिक्षण आदी मुद्यांवरच राज बोलत राहिले. पुढे भाषणात मराठा आरक्षणाचा मुद्दाही त्यांनी मांडला. जातीपेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण हवे, अशी भूमिका मांडली. त्यानंतर राज आपल्या कार्यकर्त्यांना नवा अजेंडा देऊन निवडणुकांचे नारळ फोडतील, हा अंदाजही खरा ठरला नाही. पण, काही मुद्यांवर काम करीत आहे, योग्य वेळी ते बाहेर काढणार आहे, असे सांगत, मात्र, तेव्हा माझ्यासोबत या, अशी हाक राज यांनी दिली. तेव्हा मात्र टाळ्या वाजवून गर्दीने दाद दिली. आपल्या भाषणाच्या उत्तरार्धातही राज हे फार काही बोलले नाहीत. त्यामुळे राज यांच्या भाषणाच्या जुन्या कॅसेटचीच चर्चा मेळाव्यानंतर होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख