raj thakare and jain muni | Sarkarnama

जैन मुनींनो फतवे काढणे बंद करा ; अजानसाठी स्पीकर हवेत कशाला - राज ठाकरे

उमेश घोंगडे
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे : कत्तलखान्यांना विरोध करणाऱ्या जैन मुनींनी फतवे काढणे बंद करावे. तर मुस्लीम बांधवाना अजान देण्यासाठी स्पीकरची गरज काय, असे सांगत प्रत्येकाने धर्म आपापल्या घरात खुशाल पाळावा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. पुण्यातील मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी मराठा आरक्षणापासून नोकरी व रोजगाराच्या विषयावर भाष्य केले. 

मध्यंतरी पर्यूषण पर्व काळात कत्तलखाने बंद करावेत, अशी मागणी जैन मुनींनी केली होती. त्यावेळी बराच वाद निर्माण झाला होता. जैन मुनींनी राज ठाकरे यांच्यावर व राज ठाकरे यांनी जैन मुनींवर आरोपप्रत्यारोप केले होते. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत राज ठाकरे यांनी भाष्य केले. कोणी कधी काय खावे, हे सांगणारे तुम्ही कोण असा प्रश्‍न करून प्रत्येकाने धर्माचे पालन करावे. मात्र त्याचा इतरांना त्रास होईल, असे वागू नये, अशी आपली भूमिका असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुस्लीम बांधवांनी नमाज पढण्यासाठी रस्त्यावर येऊ तसेच अजानसाठी स्पीकरचा वापर करू, नये असा पुनरूच्चार त्यांनी केला. मध्यंतरी काही गुजराती व्यापारी माझ्याकडे आले होते. त्यांनी त्यांची बाजू मांडली मात्र मी माझ्या भाषेत काय सांगायचे ते सांगितले. मी सरळ विचार करणारा माणूस आहे. जे आहे ते थेट बोलण्याची माझी सवय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जातीच्या आधारावर आरक्षणाचा मुद्दा जाती-जातीत विष पेरत आहे. विश्‍वनाथ प्रतापसिंग यांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून हे विष पेरायला सुरवात केली. त्याची फळे आपण आज भोगत आहोत. मात्र यातून हाती काहीच पडणार नाही. अर्थिक निकषावर आरक्षण हाच आपल्या देशातील व्यवहार्य तोडगा असल्याचे सांगत स्थानिक तरूणांना नोकरी व रोजगार दिला तर जातवार आरक्षणाची गरज उरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख