मोदी भक्तांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये - राज ठाकरे

मोदी भक्तांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये - राज ठाकरे

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्तांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, पाकिस्तानबरोबर युद्धाची भाषा करणाऱ्या सरकारला आम्ही प्रश्‍न करणारच, आम्ही प्रश्‍न विचारणारच असा हल्ला चढवत देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानचा भागीदार आणि एक अरब उद्योगपती असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी बाळा नांदगावकर, अभिजित पानसे आदी नेते उपस्थित होते. 

आम्हाला देशभक्ती शिकवणारे मोदी कुठलाही यापूर्वी ठरलेला कार्यक्रम नसताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आणि त्यांना केक भरवायला कशासाठी गेले असा सवालही त्यांनी विचारला. मोदी भक्तांच्या ट्रोलिंगला मी घाबरत नाही असे सांगून त्यांनी पुलवामा घटनेपूर्वी देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागारांची बैठक 29 डिसेंबरला कशासाठी झाली होती असा सवालही त्यांनी विचारला. 

लोकसभा निवडणुका मनसे लढवणार की नाही याचा निर्णय आजच्या सभेत नाही तर योग्य वेळी घेईन असेही त्यांनी स्पष्ट केले. एअर स्ट्राईक वरून त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा व भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com