raj thakare and bjp | Sarkarnama

भाजपला आता राममंदिर आठवले - राज ठाकरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे : भारतीय जनता पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराची आठवण होईल असे मी यापूर्वी सांगितले होते. आता तसेच घडले आहे, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच सांगितले की अयोध्येत राममंदिर आम्ही उभारणार आता बरा, यांना राम आठवला? मंदिर हे निवडून आल्यावर पहिल्याच वर्षी व्हायला हवे होते, पण नाही त्यांना या प्रश्‍नावर केवळ राजकारण करायचे आहे, त्यांनी रामाच्या नावावर गंगाजल वाटले, विटा गोळ्या केल्या, कुठे गेल्या त्या विटा ? अशी घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर आज केली. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच कॉंग्रेस अशा सर्व पक्षावर टीका करताना त्यांनी राज्यातील सर्व पक्षांच्या खासदारांवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले मराठीच्या मुद्यावर या खासदारांनी संसदेत कधी आवाज उठवला आहे का ? "नीट'च्या परीक्षेत तामिळी भाषेतील प्रश्‍नामध्ये चुका झाल्यावर तेथील एक खासदार न्यायलयात गेले व न्यायालयाने त्या चुकीच्या प्रश्‍नांबद्दल मार्क द्यायला सांगितले. हे सांगतानाच त्यांनी सर्व तरुणांना राजकीय पक्षांपासून सावध राहायला सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदीं च्या नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा टीका करून त्यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांची मिठी न स्वीकारल्याबद्दल तसेच देशाबाहरेच्या आलेल्या प्रत्येक मोठ्या पाहुण्याला गुजरातमध्ये नेण्याबद्दलही त्यांनी टीका केली. पंतप्रधान पदावरची व्यक्ती ही एका राज्याची नसते तर ती संपूर्ण देशाचे प्रतिनिधीत्व करत असते याचे भान सुटता कामा नये असेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख