कोणता झेंडा घेऊ हाती; मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांच्याकडे विचारणा...

कोणता झेंडा घेऊ हाती; मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांच्याकडे विचारणा...

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी, शहांच्या विरोधात प्रचार करण्याची भूमिका जाहीर केली आहे. मनसे कार्यकर्त्यांना देखील त्यांनी हेच आवाहन केले आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे चंद्रकांत खैरे वगळता कॉंग्रेस, अपक्ष, एमआयएम वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. 

नेमका यापैकी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असा प्रश्‍न मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पडला आहे. "कोणाचा झेंडा घेऊ हाती' असे म्हणत मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्याकडे कॉंग्रेस उमेदवार सुभाष झांबड व अपक्ष हर्षवर्धन जाधव या दोघांची नावे पाठवली आहेत. यापैकी कुणाला पाठिंबा द्यायचा अशी विचारणा या प्रस्तावात करण्यात आली आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मनसेला कॉंग्रेसच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही, पण भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुक्त भारत करण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. 

त्यानुसार मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते युतीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. औरंगाबादेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे तर जालन्यात भाजपचे रावसाहेब दानवे उमेदवार आहेत. या दोन्ही मतदारसंघात अन्य कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा अशी विचारणा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

औंरगाबादमधून कॉंग्रेसचे उमेदवार असलेले आमदार सुभाष झांबड आणि पुर्वाश्रमीचे मनसे आमदार आणि नुकताच शिवसेनेकडून आमदारकीचा राजीनामा दिलेले हर्षवर्धन जाधव यांची नावे राज ठाकरेंकडे पाठवण्यात आली आहेत. गुरुवारी (ता. 4) सायंकाळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. युतीच्या पराभवासाठी राज ठाकरे यांनी औरंगाबादला सभा घ्यावी, अशी विनंती देखील या प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे. या शिवाय राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या गुढीपाडवा सभेला जिल्ह्यातून दोनशे चारचाकी वाहनातून कार्यकर्ते नेण्याचे नियोजन झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com