भाजप शिवसेनेची रोज इज्जत काढतय : राज ठाकरे

भाजप शिवसेनेची रोज इज्जत काढतय : राज ठाकरे

पुणे : शिवसेना पुण्यात दिसत नाही. भाजप शिवसेनेची रोज इज्जत काढत आहे, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यात केली.

शिवसेनेने आधी स्वबळावर लढविण्याची घोषणा केली होती. काय झाले त्या घोषणेचे, असा सवाल करत त्यांनी पुणे आणि नाशिकसारख्या शहरात शिवसेना दिसत नाही. शिवसेना लाचार झाल्याची टीका त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेवर अशी वेळ आली नसती, असेही त्यांनी नमूद केले.

कलम 370 रद्द केल्याबद्दल मी अभिनंदन केले होते. मात्र महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल भाजप नेते बोलत नाहीत, असे सांगत राज्याच्या प्रश्नांकडे भाजप नेत्यांचे लक्ष नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना नोकऱ्या नाही, शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाही, बॅंका बुडत आहेत आणि हे 370 कलमावर बोलतायत. त्याच्यावर कोणी बोलत नाही. बॅंका बुडण्याशी सरकारचा संबंध नसल्याचे देशाच्या अर्थमंत्री सांगतात. लोकांच्या ठेवी देण्यासाठी सरकार पुढे आले पाहिजे. पण काही होत नाही.  कारण मतदार काही करू शकत नाही, हे त्यांनी जोखलेले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख करत त्यांना आमचे उमेदवार पुरून उरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात प्रबळ विरोधी पक्ष घडविण्यासाठी मला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com