नाशिक महापालिकेच्या कारकिर्दीत उमटला राज ठाकरेंच्या कल्पकतेचा विशेष ठसा

नाशिक महापालिकेच्या स्थापनेला आज सत्तावीस वर्षे पुर्ण झाली. या कालावधीत प्रशासकी कामकाजापासून तर राजकीय सत्तेत अनेक स्थित्यंतरे झाली. मात्र यामध्ये सर्वाधिक चार महापौर अन्‌ नऊ वर्षे शिवसेनेकडे सत्ता राहिली. यंदा पहिल्यांदाच एक हाती सत्तेत आलेल्या भाजपने दोन महापौर दिले. मात्र या सर्व कारकिर्दीत कामाचा ठसा उमटला तो राज ठाकरे यांच्या कल्पकतेचा.
Nashik Garden - Raj Thackery
Nashik Garden - Raj Thackery

नाशिक : नाशिक महापालिकेच्या स्थापनेला आज सत्तावीस वर्षे पुर्ण झाली. या कालावधीत प्रशासकी कामकाजापासून तर राजकीय सत्तेत अनेक स्थित्यंतरे झाली. मात्र यामध्ये सर्वाधिक चार महापौर अन्‌ नऊ वर्षे शिवसेनेकडे सत्ता राहिली. यंदा पहिल्यांदाच एक हाती सत्तेत आलेल्या भाजपने दोन महापौर दिले. मात्र या सर्व कारकिर्दीत कामाचा ठसा उमटला तो राज ठाकरे यांच्या कल्पकतेचा.

महापालिकेची स्थापना 7 नोव्हेंबर, 1992 ला झाली. उद्या पालिकेचा 28 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या कालावधीत महापालिकेचे अंदाजपत्रक 13 कोटींहून दोन हजार कोटींवर पोहोचले. शहराची लोकसंख्या 14.86 लाख, 477 उद्याने, 2100 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि दरडोई 150 लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असा या शहराचा विस्तार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात हे शहर समाविष्ट आहे. मात्र, वाहतुक कोंडी, पार्कींग, गोदावरीसह शहरातील नंदिनी, वालदेवी या तिन्ही नद्यांचे प्रदूषण, आरोग्याच्या समस्या, समाविष्ठ खेड्यांचा विकास या समस्या आहेत. विकास योजनांतील गुणवत्तेचा अभाव व गैरकारभाराच तक्रारी या महापालिकेच्या समस्या आहेत. प्रशासनापुढी ही आव्हाने समर्थपणे हाताळणारे राजकीय नेतृत्व सध्या तरी डोळ्यापुढे दिसत नाही.

महापालिकेच्या इतिहासात गोदापार्क, उड्डानपुलांसह सुशोभिकरण, ट्रॅफीक उद्यान, 2015 चा सिंहस्थ कुंभमेळा, सीएसआर फंडातून केलेले बॉटनिकल गार्डन व लेजर शो, उड्डानपुला खालील उत्तम सुशोभिकरण यांची नावाजलेल्या प्रकल्पांत गणती होती. हे सर्व प्रकल्प मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील आहेत. त्याने या शहराचा एक चेहरा प्राप्त झाले. अर्थात त्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांना ते सुरळीत सुरु ठेवता आले नाहीत ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. मात्र महापालिकेच्या सत्तावीस वर्षांच्या कारकिर्दीत या प्रकल्पांनी राज ठाकरे यांचा विशेष ठसा उमटला.

महापालिकेला माजी नगराध्यक्ष, आमदार तथा कॉंग्रेसचे नेते शांतारामबापू वावरे हे पहिले महापौर लाभले. ते सलग दोन वर्षे महापौर होते. त्यानंतर आजवर सत्तावीस वर्षात 15 महापौर लाभले. त्यात श्री. वावरे, पंडितराव खैरे, प्रकाश मते, डॉ. शोभा बच्छाव हे पाच कॉंग्रेसचे होते. शहरातील टंचाईवर कायमस्वरुपी तोडगा, काश्‍यपी धरणातील आपक्षण व स्वमालकिचे धरण ही संकल्पना श्री. वावरे यांनी आणली. तर श्री. मते यांनी घंटागाडी प्रकल्प सुरु केला. तो सर्वस्तरावर नावाजला गेला. शिवसेनेचे वसंत गिते, दशरथ पाटील, विनायक पांडे, नयना घोलप हे चार महापौर होते. 

महापौरांचा कालावधी वाढल्याने सलग नऊ वर्षे त्यांनी कारभार केला. यामध्ये दशरथ पाटील यांच्या कालावधीत सिंहस्थ आणि गोदापार्क ही ठोस कामे झाली. मात्र त्यांच्या कारकिर्दीत अनेक कामांच्या गुणवत्ता, झोपडपट्टी निर्मुलनाच्या कामातील गोंधळ, तक्रारींनीच गाजला. सध्या स्वबळावर सत्तेत असलेल्या भाजपने बाळासाहेब सानप, रंजना भानसी हे दोन महापौर दिले. त्यांनी पाच वर्षे कारभार हाकला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2012 ते 2017 या कालावधीत अॅड. यतीन वाघ, अशोक मुर्तडक हे दोन महापौर झाले. या कालावधीत सीएसआर निधीतून अनेक महत्वाचे प्रकल्प, सुशोभिकरण व ठोस काम करण्यात आली. या कालावधीत झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साडे तीन हजार कोटींचा आराखडा राबविण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या अलिकडच्या कामकाजात ठसा उणटवला तो राज ठाकरे यांनीच. त्याबाबत सामान्य मतदारांच्या मनातही सकारात्मक भावनाच राहिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com