राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार : ईव्हीएमबाबत एक ऑगस्टला चर्चा

राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार : ईव्हीएमबाबत एक ऑगस्टला चर्चा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ईव्हीएम हटावसाठी प्रयत्नशील असून तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तेे एक ऑगस्ट रोजी भेट घेणार आहेत.

राज हे कोलकाता येथे जावून ममता बॅनर्जी यांच्यासोबत ईव्हीएम बाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. 2014च्या निवडणूकांनंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशिन बाबत सतत शंका उपस्थित केल्या आहेत.

या लोकसभा निवडणूक निकालानंतर तर त्यांनी ईव्हीएम मशिन हेच भाजप विजयाचे खरे कारण असल्याचे सुतोवाच केले. अनेक मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदान व मोजणी झालेले मतदान यातली तफावत राज ठाकरे यांनी निदर्शनास आणली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्‍त यांचीही भेट घेवून रितसर तक्रार नोंदवली होती. त्यामुळे, ईव्हीएम मशिन हटवून बॅलेट पेपर वरच निवडणूका झाल्या पाहिजेत असा आग्रह राज ठाकरे यांचा आहे. याच पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे व ममता बॅनर्जी यांची भेट महत्वाची मानली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com